कोरोना व्हायरस (Corona Virus) ! हे नाव सुद्धा आता ऐकलं तरी अनेकांच्या छातीत धडकी भरतेय, चीन मध्ये थैमान घालून आता जगभरातील तब्बल 52 देशांमध्ये हा जीवघेणा व्हायरस पोहचला आहे. हजारोच्या संख्येत लोकांनी प्राण गमावले आहेत. रात्रीच्या रात्री संसर्गित भागातून लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. या संसर्गाची बाधा होऊ नये म्ह्णून लोकं मास्क लावल्याशिवाय तोंड झाकल्याशिवाय घरातून बाहेर पडायला सुद्धा कचरत आहे तिथे बॉलिवूड मधील एक अभिनेता मात्र देव करो आणि कोरोनाची लागण भारतात सुद्धा होऊ देत असे ट्विट करतोय. तुम्हालाही हे ऐकून धक्का बसलाच ना? हा व्यक्ती म्हणजे अन्य कोणी नाही तर स्वतः केआरके (KRK) म्हणजेच कमाल रशीद खान हा आहे. अलीकडेच KRK ने हे वादग्रस्त ट्विट केले आहे, पण त्याच्या या मागणीमागे नेमकी भावना काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत.
काय म्हणाला केआरके?
कमाल खान उर्फ केआरके याने आपल्या ट्विट मध्ये "कोरोना वायरस लवकरात लवकर भारतात यावा अशी प्रर्थना मी देवाकडे करतो. असे झाल्यास देशातील लोक हिंदू, मुस्लिम, शिख, ख्रिश्चन असे धार्मिक मतभेद सोडून एकत्र येतील. आणि करोना वायरसशी झुंज देतील.” असे म्हंटले आहे, अर्थात देशात एकटा यावी हा उद्देश काही चुकीचा नाही पण त्यासाठी कोरोनाची लागण व्हावी अशी प्रार्थना करणे म्हणजे जरा अतीच म्हणावे लागेल. कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी राखी सावंत चालली चीनला; NASA कडून मागवले खास औषध (Video)
पहा ट्वीट
I pray to GOD for the #caronavirusoutbreak in India as soon as possible. May be, we all Hindu Muslim Sikh Christians become brothers again to fight against #coronavirus!
— KRK (@kamaalrkhan) February 29, 2020
दरम्यान, कमाल खानचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. अनेकांनी तर त्याला कोरोनाची सुरुवात झालीच तर तुझ्यापासूनच व्हावी अशा खोचक शब्दात उत्तर देखील दिले आहे. मुळात केआरकेने अशा प्रकारचे ट्विट किंवा वक्तव्य करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही, यापूर्वी देखील त्याने अनेक प्रसंगी अनेक व्यक्तींवर ताशेरे ओढले आहेत, आणि आपल्या या वादग्रस्त विधांनमुळेच कदाचित तो कायम चर्चेत देखील राहिला आहे.