कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी राखी सावंत चालली चीनला; NASA कडून मागवले खास औषध (Video)
राखी सावंत (Photo Credits: Yogen Shah)

टीव्हीपासून चित्रपटसृष्टीपर्यंत वादविवाद क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राखी सावंतने (Rakhi Sawant), पुन्हा एकदा असे काहीतरी केले आहे ज्यामुळे सध्या ती चर्चेचा विषय बनली आहे. राखी सोशल मिडियावर फार सक्रीय असते व दररोज काहीतरी नवे करून ती तिच्या चाहत्यांचे मनोरंजन करत राहते. नुकताच राखीने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती आपण चीनला (China) जात आहोत असे म्हणत आहे.

कोरोना विषाणू (Corona Virus) हा काही काळापासून चीनमधील लोकांसाठी एक समस्या बनला आहे. अशा परिस्थितीत राखी सावंत न घाबरता या व्हायरसचा सामना करण्यासाठी चीनकडे रवाना झाली आहे.

पहा राखी सावंतचा व्हिडीओ -

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

या व्हिडीओमध्ये ती दावा करत आहे की, आपण नासाकडून एक खास औषध मागवले आहे, जे घेऊन आपण चीनला जात आहोत. आता चीनमधील कोरोना व्हायरस पूर्णतः नष्ट होईल अशी तिची अपेक्षा आहे. तिने विमानातील हा व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती कोरोना विषाणूचा उल्लेख करताना दिसत आहे. आपल्या या व्हिडिओसह राखीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'ती कोरोना व्हायरस मारण्यासाठी चीनला जात आहे.' आपल्या व्हिडीओद्वारे तिने ही बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही दिली आहे. (हेही वाचा: राखी सावंत ने बाथटब मध्ये अंघोळ करतानाचा व्हिडीओ शेअर करत फॅन्सना दिली 'ही' खुशखबर)

या व्हिडीओमध्ये राखी पूर्णतः लाल कपड्यांमध्ये दिसून येत आहे. सोबत तिने मंगळसूत्रही घातले आहे. मुख्य म्हणजे आपण नासाकडून कोरोना व्हायरस मारण्याचे औषध मागवले असल्याचे तिने सांगितले आहे, यामुळे ती आता चेष्टेचा विषयही बनली आहे. दरम्यान, आपणा सर्वांनाच ठाऊक असेल की 2019 साली राखी सावंत तिच्या लग्नाबद्दल चर्चेत राहिली. मात्र राखीने अद्याप आपल्या पतीची ओळख लोकांशी करून दिली नाही.