Raju Srivastava Update: खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर कॉमेडियन राजू श्रीवास्तवचे कुटुंब संतापले; सायबर पोलिसांनी सोशल मीडियावरून हटवले 42 पेज
Raju Srivastava | (Photo Credits: Facebook)

Raju Srivastava Update: कॉमेडियन-अभिनेता राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) सध्या दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार घेत आहेत. कॉमेडियन 17 दिवसांपासून व्हेंटिलेटरवर आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असली तरी डॉक्टरांची टीम रात्रंदिवस या विनोदवीराला शुद्धीवर आणण्यासाठी झटत आहे. राजू श्रीवास्तव यांचे कुटुंबीय, चाहते आणि सहकारी त्यांच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. पण असे काही लोक आहेत जे स्वतःच्या फायद्यासाठी सोशल मीडियावर राजूच्या प्रकृतीशी संबंधित खोट्या बातम्या पसरवत आहेत. या खोट्या अफवांमुळे कॉमेडियनचे कुटुंब अस्वस्थ झाले आहे.

यानंतर राजू श्रीवास्तव यांचा भाऊ दीपू श्रीवास्तव याने मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार दाखल केली आहे. रिपोर्ट्सनुसार, दीपूने सांगितले की, फेक न्यूजमुळे कुटुंबीय नाराज आहेत. त्यामुळे त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. मिळालेल्या माहितीनुसार, सायबर सेलने कॉमिकच्या आरोग्याशी संबंधित खोट्या बातम्या पसरवल्याबद्दल सोशल मीडियावरील 42 पेज ब्लॉक केले आहेत. (हेही वाचा - Salman Khan New Look: नवीन लूकवरमुळे सलमान खान ट्रोल; नेटीझन्स म्हणाले, 'सगळ्या मूडचा सत्यनाश केला')

राजू श्रीवास्तव यांना 10 ऑगस्ट रोजी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजूचे व्हेंटिलेटर दोनदा काढण्यात आले. पण डॉक्टरांनी त्याला पुन्हा लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवले.

दरम्यान, अलीकडेच राजू श्रीवास्तव यांची मुलगी अंतरा हिने सांगितले की, तिच्या वडिलांची प्रकृती स्थिर आहे. त्यांची प्रकृती हळूहळू सुधारत असल्याचेही ती म्हणाली. त्यांनी प्रत्येकाने केवळ एम्स दिल्लीच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावर आणि कॉमेडियनने जारी केलेल्या विधानांवर अवलंबून राहण्याचे आवाहन केले.