Salman Khan New Look: बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) चा नवा लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सलमानने चित्रपटसृष्टीत 34 वर्षे पूर्ण केली. त्याने 1988 मध्ये 'बीवी हो तो ऐसी' या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. हे आणखी खास बनवण्यासाठी, सुपरस्टारने नवीन चित्रपटाचे शीर्षक आणि त्याचा नवीन लूक सोशल मीडियावर शेअर केला. आता सोशल मीडियावर सलमानच्या या लूकच्या चर्चा सुरू आहे.
दरम्यान, शुक्रवारी सलमानने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये त्याचे लांब दाट केस वाऱ्यात उडत आहेत. डोळे काळ्या चष्म्याने झाकलेले आहेत आणि सुपरस्टार पूर्ण स्वॅगमध्ये दिसत आहे. व्हिडिओमध्ये सलमान खान त्याच्या 34 वर्षांच्या प्रवासाचा उल्लेख करत असून या प्रवासात त्याला साथ दिल्याबद्दल त्याच्या चाहत्यांचे आभारही मानत आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सलमान खानने #KisiKaBhaiKisiKiJaan हा हॅशटॅग वापरला आहे. चाहत्यांनी अंदाज लावला की, सलमानच्या आगामी चित्रपटाचे हे नवीन शीर्षक 'किसी का भाई किसी की जान' आहे. (हेही वाचा - Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan: सलमानच्या चाहत्यांसाठी खुशखबर, इंडस्ट्रीत 34 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल नवीन चित्रपटाची घोषणा)
सलमान खानच्या या पोस्टमध्ये असं कोठेही स्पष्ट करण्यात आलेलं नाही की, त्याच्या 'कभी ईद कभी दिवाळी' या चित्रपटाचे नाव बदलण्यात आले असून आता तो 'किसी का भाई किसी की जान' या नव्या शीर्षकासह प्रदर्शित होणार आहे. आता लोक सोशल मीडियावर सलमान खानच्या नव्या लूकची खिल्ली उडवत आहेत. काही जण सलमानच्या या नव्या लुकची तुलना बकरी आणि अस्वलाशी करत आहेत.
Same To Same 😂🤣 pic.twitter.com/ppGQCfsqYw
— amar (@Amar_ji1) August 26, 2022
Close enough😭#KisiKaBhaiKisiKiJaan pic.twitter.com/ishGQimwfT
— 𝐑𝐚𝐣𝐚 𝐁𝐚𝐛𝐮 (@akkian_raja09) August 26, 2022
Mood ka satyanaash
— D🦁 (@Kaise_ho_bhai) August 26, 2022
'कभी ईद कभी दिवाळी'चे शूटिंग सुरू झाले आहे. याआधी, त्रपटात आयुष शर्मा असल्याची बातमी समोर आली होती. नंतर आयुषने सांगितले की, त्याने क्रिएटिव्ह फरकामुळे चित्रपटाला बाय-बाय म्हटले आहे. या चित्रपटात शहनाज गिल देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. शहनाज सलमानच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.