The Accidental Prime Minister सिनेमावरुन अनुपम खेर यांच्याविरोधात तक्रार दाखल
The Accidental Prime Minister (Photo Credit: Twitter)

अभिनेते अनुपम खेर यांचा 'द एक्सीडेंटल प्राईम मिन्सिटर' (The Accidental Prime Minister) हा सिनेमा सध्या वादात अडकला आहे. हा सिनेमा माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या राजकीय जीवनपट उलघडतो. सिनेमात अनुपम खेर मनमोहन सिंग यांची भूमिका साकारत आहेत. आधीच या सिनेमावरुन वाद रंगत असताना आता अनुपम खेर (Anupam Kher) यांच्या विरोधात बिहार न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सिनेमातून काही लोकांची बदनामी होत असल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. The Accidental Prime Minister : अपेक्षित बदल केले नाहीत, तर चित्रपट प्रदर्शित करू देणार नाही; सत्यजीत तांबे यांचा इशारा

मुझफ्फरपूर मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात वकील सुधीर कुमार ओझा यांनी ही तक्रार दाखल केली आहे. तक्रार दाखल करुन घेतली असून 8 जानेवारीला उप विभागीय न्यायिक दंडाधिकारी न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. The Accidental Prime Minister सिनेमाच्या वादावर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया, राहुल गांधींनी विरोध करणार्‍यांना दटावले पाहिजे!

 

या सिनेमात अक्षय खन्ना (Akshaye Khanna) मनमोहन सिंग यांचे मीडिया सल्लागार संजय बारु यांच्या विशेष भूमिकेत दिसणार आहे. मात्र मनमोहन सिंग आणि संजय बारु यांची भूमिका साकारताना अनुपम खेर आणि अक्षय खन्ना यांनी त्यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचवला आहे. त्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्याचे याचिकेत म्हटले आहे.

सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर काँग्रेसने सिनेमावर आपेक्ष घेत हा गांधी कुटुंबाच्या बदनामीचा डाव असल्याचे म्हटले होते. सिनेमाचा ट्रेलरही युट्युबवरुन हटवण्यात आला असून अनुपम खेर यांनी त्याबद्दल युट्युबकडे मदतही मागितली आहे.