Kantara Cast Accident: 'कंतारा: चॅप्टर 1' (Kantara: Chapter 1) या चित्रपटाबाबत एक वाईट बातमी येत आहे. कंतारा चित्रपटातील सिनेतारकांनी भरलेली मिनी बस उलटली. या बसमध्ये चित्रपटाचे 20 कलाकार होते, त्यापैकी सहा ज्यूनिअर कलाकार जखमी झाले. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, कन्नड ब्लॉकबस्टर चित्रपट 'कंतारा'च्या प्रीक्वलमधील सहा कनिष्ठ कलाकार या अपघातात (Accident) जखमी झाले आहेत. रविवारी रात्री जडकलजवळ हा अपघात झाला. चित्रपटाची टीम प्रवास करत असलेली मिनी बस अचानक उलटली.
प्राप्त माहितीनुसार, जडकालमधील मुदूर येथे शूटिंग पूर्ण करून ते कोल्लूरला परतत असताना ही घटना घडली. मिनी बसमध्ये 20 ज्युनियर आर्टिस्ट होते. या अपघातात सहा ज्युनियर कलाकार गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात जखमी झालेल्या कलाकारांना तात्काळ जडकल आणि कुंदापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कोल्लूर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. (हेही वाचा -Raj Kapoor Biopic: राज कपूरच्या बायोपिकवर रणबीर कपूरचं वक्तव्य, म्हणाला- 'हा खूप कठीण बायोपिक असेल')
Kantara Movie Artist Bus Accident : ಕಾಂತಾರಾ ಚಿತ್ರದ ಕಲಾವಿದರು ತೆರಳ್ತಿದ್ದ ಬಸ್ ಅಪಘಾತ! #kantara #KantaraChapter1 #BusAccident #RishabShetty #Jadkaal #Kollur #JuniorArtists pic.twitter.com/jVed2dPTFs
— The Federal Karnataka (@TheFederal_KA) November 25, 2024
'कंतारा' ठरला होता ब्लॉकबस्टर -
ऋषभ शेट्टीने नुकतीच 'कंतारा: चॅप्टर 1'ची रिलीज डेट जाहीर केली होती. हा चित्रपट 2 ऑक्टोबर 2025 रोजी रिलीज होणार आहे. ऋषभ शेट्टीचा 'कंतारा' हा चित्रपट 2022 साली प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. हा चित्रपट हिट झाल्यानंतरच ऋषभने त्याचा सिक्वेल जाहीर केला होता.