Sushant Singh Rajput (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या निधनानंतर सर्वांना मोठा धक्का बसला आहे. सुशांतने अचानक घेतलेल्या एक्सिटनंतर देशातील सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर दुःखी असलेल्या प्रत्येक देशवासियाला सुशांतने इतके टोकाचे पाऊल का उचलले हे जाणून घ्यायचे आहे. सुशांतच्या आत्महत्येचा मुंबई पोलिस तपास करत आहेत. सुशांतच्या घरात सुसाईड नोट मिळाली नसली तरी 5 डायऱ्या हाती लागल्या आहेत. यातून सुशांतच्या दुःखाचे, आत्महत्येचे गुढ उकलेल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान सुशांतचा जीवनपट चित्रपट रुपात लवकरच पाहायला मिळेल. अलिकडेच कमाल राशिद खान (Kamaal Rashid Khan) यांनी सुशांत सिंह राजपूत याच्या जीवनावर चित्रपट काढणार असून त्यात गुन्हेगारांचा पर्दाफाश करण्यात येईल, असे ट्विटच्या माध्यमातून सांगितले आहे.

तर लेटेस्ट मीडिया रिपोर्टनुसार, फिल्ममेकर विजय शेखर गुप्ता (Vijay Shekhar Gupta) देखील सुशांतचा जीवनपट रुपेरी पडद्यावर रंगवणार आहेत. 'सुसाईड और मर्डर ए स्टार व्हॉज लॉस्ट' (Suicide or Murder? A Star Was Lost) असे या चित्रपटाचे नाव असणार आहे. या सिनेमाचे एक पोस्टर देखील त्यांनी रिलीज करण्यात आले आहे. (सुशांत सिंह राजपूत ने घातलेल्या टी शर्ट्स वरील संदेश देतात त्याचे बॉलिवूड मधील संघर्षाचे संकेत? Watch Photos)

पहा पोस्टर:

 

View this post on Instagram

 

A post shared by VIJAY SHEKHAR GUPTA (@iamvijayshekhar) on

सिनेसृष्टीतील बॉलिवूडच्या मोठ्या स्टार्सची असलेली मोनोपॉली नष्ट करण्यासाठी हा सिनेमा बनवू इच्छित असल्याचे विजय गुप्ता यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले, "या सिनेमाद्वारे बॉलिवूडला पूर्णपणे एक्सपोज करणार आहे. बाहेरुन अनेक प्रतिभासंपन्न मुले कामाच्या शोधात सिनेसृष्टीत पाऊल ठेवतात. मात्र खूप कमी लोकांना यात यश मिळते. कारण येथे बॉलिवूड गँगचे राज्य आहे. हा सिनेमा सुशांत सिंह राजपूतचा बायोपिक नसून सुशांतच्या जीवनप्रवासाने प्रेरित झालेला सिनेमा असेल. यामुळे सिनेसृष्टीचे खरे रुप लोकांसमोर येईल. प्रत्येकाला बॉलिवूडमध्ये काम करण्याचा हक्क आहे. मग ती व्यक्ती बॉलिवूड परिघातील असेल किंवा बाहेरची."

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलिस सुशांतच्या जवळील व्यक्तींचा जबाब नोंदवत आहेत. काल सुशांतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती ही वांद्रे पोलिस स्थानकात दाखल झाली होती. कसून चौकशी केल्यानंतर पोलिसांनी तिचा जबाब नोंदवला आहे.