Ganesh Visarjan 2020: बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितने सांगितली गणपती बाप्पाच्या आवडीचे 'उकडीचे मोदक' बनवण्याची रेसिपी; Watch Video
माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने (Photo Credits: Instagram)

Ganesh Visarjan 2020: बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) च्या डान्स आणि अभिनयाचे अनेक दिवाणे आहेत. परंतु, तुम्हाला माहित आहे का? माधुरी खाण्याच्या बाबतीतदेखील फुडी आहे. माधुरीने अनंद चतुर्थीच्या मुहूर्तावर गणपती बाप्पाचा आवडता पदार्थ म्हणजेच उकडीचे मोदक (Ukadiche Modak) बनवले आहेत. विशेष म्हणजे माधुरीने तिच्या आजीने सांगितलेली उकडीच्या मोदकाची रेसिपी चाहत्यांसाठी शेअर केली आहे.

माधुरीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही रेसिपी बनवताचा व्हिडिओ शेअर केला आहे. यात तिचे पती श्रीराम नेनेदेखील दिसत आहेत. त्यांनी माधुरीने बनवलेल्या मोदकाचा आस्वाद घेतला आहे. माधुरीचा उकडीचे मोदक बनवतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (हेही वाचा -Healthy Laddu Recipes: रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी गाजर, ड्रायफ्रूट्सपासून बनवलेले 'हे' पौष्टिक लाडू अवश्य खा, पाहा रेसिपीज)

माधुरीने हा व्हिडिओ शेअर करताना म्हटलं आहे की, 'माझ्या घरात मोदक सर्वांनाचं आवडतात. हे मोदक कसे बनवतात. त्याची सीक्रेट रेसीपी तुमच्यासाठी तयार आहे.' माधुरीच्या या व्हिडिओला तिच्या चाहत्यांनी लाईक तसेच कमेंट्स दिल्या आहेत. माधुरीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, ती लवकरचं नेटफ्लिक्सवरील एका वेबसीरजमध्ये दिसणार आहे.