Raj Kundra वर बॉलिवूड अभिनेत्री चे लैंगिक अत्याचाराचे आरोप; जबरदस्ती किस केल्याचा दावा
Raj Kundra | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

पॉर्न फिल्म केस मध्ये सध्या मुंबई पोलिसांच्या अटकेत असलेला व्यावसायिक राज कुंद्रा याच्यासमोर अडचणींची मालिका सुरू झाली आहे. सध्या राज कुंद्राच्या जामिनाला फेटाळत त्याला न्यायालयीन कोठडी बजावण्यात आली आहे. अशामध्ये आता एका बॉलिवूडच्या अभिनेत्रीने राज कुंद्रा वर लैंगिक अत्याचाराचे आरोप लावले आहेत. सध्या या प्रकरणी क्राईम ब्रांच ची प्रॉपटी सेल संबंधित अभिनेत्रीची चौकशी करत आहे. इंग्लिश वेबसाईट झूम डिजिटलच्या बातमीनुसार, या बॉलिवूड अभिनेत्रीने राज कुंद्रा विरूद्ध लैंगिक अत्याचाराचे आरोप करत त्याच्या विरूद्ध FIR दाखल केला आहे.

बॉलिवूड अभिनेत्रीने राज कुंद्रा वर आयपीसी सेक्शन 376 r/w धारा 384, 415, 420, 504 and 506, 354 (a) (b) (d) 509, 09 अंतर्गत लैंगिक अत्याचाराचे आरोप लावले आहेत.या अभिनेत्रीने दिलेल्या माहितीनुसार, 2019 साली राज कुंद्राने तिच्या मॅनेजरला बोलावून घेतले होते. आणि व्यवसायाबददल चर्चा केली. या बिझनेस मिटिंग नंतर 27 मार्च 2019 ला राज कोणतीही पूर्व सूचना न देता पोहचला आणि एका मेसेजला घेऊन वाद घालायला लागला. नक्की वाचा: भारतामध्ये Porn बाबत काय आहेत कायदे? पॉर्न पाहणं, शेअर करणं काय आहे बेकायदेशीर.

बॉलिवूड अभिनेत्रीने यावेळेस राजला विरोध केला. तिने राजला सांगितलं ती कोणत्याही विवाहित पुरूषासोबत संबंध ठेवू इच्छित नाही. सोबतच आनंदासाठी त्यामध्ये व्यवसाय देखील आणू शकत नाही. यावेळी राजने त्याचे शिल्पासोबतचे संबंध देखील तणावात असल्याचं सांगितले. राज घरी तणावात असतो.