Chitra Wagh On Urfi Javed: चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदवर कायदेशीर मागणीसाठी मुंबई पोलिस आयुक्तांची घेतली भेट

उर्फी जावेद म्हणजे सिने जगातलं एक कमालीचं प्रकरण आहे. गेले काही दिवसात हिचा कुठला चित्रपट प्रदर्शित झालेला नाही, सध्या कुठल्या वेबसिरीज किंवा टेलिव्हजन मालिकेत ती मुख्य भुमिका निभवत नाही. तरी ही बया रोज सोशल मिडियावर चर्चेत असते आणि या चर्चेचा विषय म्हणजे तिचे कपडे. कपडे? असं देखील आपण म्हणू शकतो की नाही हा देखील एक मोठा प्रश्नचं आहे कारण उर्फी कपडे म्हणून फक्त कुठल्या फॅब्रीकचा वापर करत नसुन उर्फी कधी काय परिधान करेल ह्याचा काही नेम नाही. कधी तार, दोरी, लाईटींग्स, मोबाईल फोन उर्फी कुठल्याही वस्तुला आपले कपडे बनवून मुंबईच्या रस्त्यावर अनेकदा स्पॉट होते. दरम्यान पापाराझी तिचा फोटोशूट करुन तिचे हे फोटो सध्या सोशल मिडीयावर चर्चेचं कारण ठरलं आहे. तरी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आता अभिनेत्री उर्फी जावेदच्या तोकड्या कपड्यांवर भाष्य केलं असुन उर्फीवर निशाणा साधला आहे.

 

तरी या प्रकरणी चित्रा वाघ यांनी थेट मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेतली असुन उर्फीवर तात्काळी कारवाई करण्याची मागणी केली आहे. तरी या पत्रकात चित्रा वाघ यांनी उर्फी जावेद रुपी स्त्री देहाचा बाजार रोखण्याची मागणी केली आहे. मुंबईच्या रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी बिभत्स व किळसवाणे अंगप्रदर्शन करण्याचा कुणी विचार केला नसेल असा प्रकार उर्फी करत असल्याचं चित्रा वाघ यांनी या पत्रात म्हण्टलं आहे. या अभिनेत्रीने आपल्या खासगी आयुष्यात हवं ते करावं पण असा स्त्री देहाचा बाजार मांडू नये अशी भुमिका वाघ यांनी या पत्रातून व्यक्त केली आहे. (हे ही वाचा:- Siddharth Malhotra & Kiara Advani Wedding: अखेर मुहूर्त ठरला! बॉलिवुडचं क्युट कपल सिध्दार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी नवीन वर्षात विवाह बंधनात अडकणार)

 

तर चित्रा वाग यांच्या या मागणीला अभिनेत्री उर्फी जावेद हिने ट्विट करत प्रत्त्युत्तर दिलं आहे. उर्फी म्हणाली असल्या राजकारण्यांकडं पाहून वाईट वाटतं. चर्चेत येण्यासाठी चित्रा वाघ मला टार्गेट करतात. बलात्कारसाठी माझ्या कपड्यांना दोष देत आहेत. माझ्या कपड्यांपेक्षा देशात आणखीही मोठ्या अडचणी आहे. अशा राजकारण्याची बेरोजगारी, बलात्काराचे प्रलंबित खटले याकडे लक्ष द्यावे असा टोला लगावला आहे.