बॉलिवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री रेखाचे सौंदर्य आजही अनेकांना घायाळ करते. या सौंदर्यवतीचा आज ६४ वा वाढदिवस आहे. रेखाचे नाव येताच रेखा-अमिताभ ही जोडी आपल्या डोळ्यासमोर येते. पण रेखाचे हे एकच प्रकरण गाजले असे नाही. तर तिचे नाव आणखी काही अभिनेत्यांसोबत जोडले गेले होते.
# रेखाच्या आयुष्यात प्रेम प्रकरणांची कमी नव्हती. पण सर्वात गाजलेले प्रकरण म्हणजे अभिनेता विनोद मेहरा. त्या दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आले होते. रेखा-विनोद प्रेमात आकंठ बुडाले होते. पण अशी चर्चा होती की, विनोद मेहरा यांच्या आईला रेखा सून म्हणून पसंत नव्हत्या. त्यामुळे आई आणि रेखा यात निवड करण्याची वेळ आली तेव्हा विनोद मेहरा यांनी आईची निवड करणे योग्य मानले. त्यामुळे या प्रेमावर कधी विवाहाची मोहर चढली नाही.
# रेखाचे हे प्रकरण अनेकांना आश्चर्यचकीत करेल. ९० च्या दशाकात वयाने लहान अक्षय कुमारसोबत रेखा यांचे नाव जोडले गेले. अक्षय-रेखाचे नाते अगदी गुपित होते. मात्र दोघेही नात्यांच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील होते. रेखा-अक्षय कुमारच्या प्रेमाने त्यावेळेचे अनेक फिल्मी मॅगझीनच्या कव्हर स्टोरीज बनल्या. पण या दोघांनीही कधीच या चर्चेला विरोध केला नाही किंवा पाठींबाही दिला नाही.
# रेखाची प्रेमप्रकरणं कधीच लग्नापर्यंत पोहचली नाहीत. पण प्रेमात असताना रेखाने एका व्यक्तीसोबत लग्न केले. १९९० मध्ये दिल्लीतील मुकेश अग्रवाल नावाच्या बिजनेसमॅनसोबत रेखाने लग्न केले. पण लग्नामुळे दोघेही आनंदी नव्हते. लग्नानंतर काही महिन्यातच मुकेश यांनी फाशी घेऊन आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये हत्येसाठी कोणासही जबाबदार धरु नये, असे त्यांनी म्हटले होते. पण अजूनही त्यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही.
# बॉलिवूडमधील गुपचूप प्रेमसंबंधांमध्ये रेखाचे नाव नेहमीच घेतले जाते. रेखा आणि अमिताभ हे त्यापैकीच एक नाते. आजपर्यंतही त्यांचे नाते पूर्ववत झालेले नाही. रेखा-अमिताभ आजही एकमेकांच्या प्रेमात असल्याचे म्हटले जाते.
# या प्रेमप्रकरणांसोबतच रेखाचे नाव इतर काही अभिनेत्यांसोबतही जोडले गेले. रेखाने आपल्या सिनेसृष्टीतील करिअरची सुरुवात सावन भादो या सिनेमातून केली. या सिनेमाच्या सेटवर रेखाचे नाव नवील निश्चलसोबत जोडले गेले. पण हे अफेअर फार काळ नाही टिकले.
# त्याचबरोबर रेखाचे नाव विश्वजीत, साजिद खान आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबतही जोडले गेले. पण या अफेअर्संना फार गंभीरतेने घेतले गेले नाही. तसंच ही अफेअर्स फार काळ टिकली देखील नाहीत.