Bharat Song Chashni Teaser: भारत चित्रपटातील 'चाशनी' गाण्याचा टीझर प्रदर्शित, पाहा सलमान खान आणि कतरिना यांच्या रोमँटिक अंदाजातील व्हिडिओ
Chashni Teaser (Photo Credits-You Tube)

Bharat Song Chashni Teaser: बॉलिवूडमधील दबंग सलमान खान (Salman Khan) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) यांचा आगामी चित्रपट भारत लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आल्यानंतर याबद्दल अधिकाधिक चर्चा रंगत चालल्या आहेत. आज या चित्रपटातील दुसऱ्या गाण्याचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.

चाशनी असे या गाण्याचे नाव असून सलमान आणि कतरिना कैफ हे दोघे रोमँटिक अंदाजात दिसून येत आहे. यामध्ये कतरिना हिने हिरव्या रंगातील लेहंगा घातला असून ती अत्यंत सुंदर दिसून येत आहे. चाशनी या गाण्याचा टीझर प्रदर्शित करण्यात आल्यानंतर प्रेक्षकांना तो फार आवडला असून चाहत्यांनी आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.(Bharat Movie Teaser: धर्मनिरपेक्ष भारतीयांना विचार करायला लावणार सलमान खानचा 'भारत')

भारत चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास करत असून दुसऱ्या गाण्यासाठी इस 'ईद इश्क मीठा' असे कॅप्शन देण्यात आले आहे. या चित्रपटात सलमान आणि कतरिना यांच्याशिवाय दिशा पाटनी, सुनील ग्रोवर, तब्बू, जॅकी श्रॉप आणि नोरा फतेही सुद्धा झळकणार आहे.