
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'पठाण' (Pathaan) चित्रपटातील 'बेशरम रंग' या गाण्याने भारतामध्ये धुमाकूळ घातला आहे. या गाण्यातील अनेक गोष्टींबाबत देशात मोठा वाद सुरू आहे. 'बेशरम रंग' या गाण्यात दीपिका पदुकोणने भगवी बिकिनी परिधान केली आहे, ज्यामुळे देशभरात निषेध होत आहे. आता सेन्सॉर बोर्डाने चित्रपट निर्मात्यांना ही बाब बदलण्याचे निर्देश दिले आहेत. दुसरीकडे या गाण्याबाबत एक मावा वाद निर्माण झाला आहे. हे गाणे एका पाकिस्तानी गाण्यावरून कॉपी केले असल्याचा आरोप होत आहे.
पाकिस्तानचा गायक सज्जाद अलीने (Sajjad Ali) 'पठाण' चित्रपटातील 'बेशरम रंग' या गाण्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी आरोप केला आहे की, 'बेशरम रंग' हे गाणे आपल्या एका गाण्यावरून चोरी केले आहे. त्यांच्या मते, 'बेशरम रंग' हे गाणे त्यांच्या एका 26 वर्ष जुन्या 'अब के हम बिछडे' गाण्यासारखे आहे. अली यांनी इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करून याबद्दल सांगितले आहे. तसेच कॅप्शनमध्ये लिहिले की- ‘चित्रपटातील नवीन गाणे ऐकल्यानंतर मला 26 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या 'अब के हम बिछडे' गाण्याची आठवण झाली.’
View this post on Instagram
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी गायकाने आपले 'अब के हम बिछडे' गाणे सादर केले आहे. पाकिस्तानी गायक सज्जाद अलीचे गाणे ऐकल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी शाहरुख खानच्या पठान चित्रपटातील 'बेशरम रंग' गाणे चोरी केल्याचे म्हटले आहे. एकाने लिहिले, ‘बेशरम रंग’ हे गाणे सज्जाद अलीच्या संगीतावर आधारित आहे. भारतातील लोक पाकिस्तानी गाणी चोरतात आणि त्यांना श्रेयही देत नाहीत. (हेही वाचा: 'जोपर्यंत माझे Private Parts दिसत नाहीत तोपर्यंत मला तुरुंगात टाकता येणार नाही'; उर्फी जावेदचे चित्रा वाघ यांच्या तक्रारीला उत्तर)
याआधी सोशल मीडियावर अनेक युजर्सनी दावा केला होता की, या गाण्याचे म्युझिक मकिबाच्या गाण्यातून चोरले गेले आहे. युजर्सनी बेशरम रंग आणि मेकेबाच्या गाण्याच्या क्लिप सोशल मीडियावर शेअर केल्या आणि निर्मात्यांनी मकिबाचे गाणे चोरल्याचा आरोप केला. दरम्यान, 29 डिसेंबर 2022 रोजी सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) चे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटाच्या निर्मात्यांना चित्रपटातील गाण्यांसह अनेक बदल करण्याचे निर्देश दिले होते.