अक्षय कुमार च्या Bell Bottom सिनेमाची अॅडव्हान्स बुकिंग सुरु; 'येथे' करा तिकीट बुक
Akshay Kumar (Photo Credits: Youtube)

कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव कमी होत असून जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. अशाच निर्माते देखील आपले सिनेमे सिनेमागृहात रिलीज करण्याच्या तयारीत आहेत. अक्षय कुमार (Akshay Kumar) चा सिनेमा 'बेल बॉटम' (Bell Bottom) सिनेमागृहात रिलीज होणार आहे. सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. याची माहिती अक्षय कुमारने सोशल मीडियावर पोस्ट करत दिली आहे. अक्षयने टीझर शेअर करत अॅडव्हान्स बुकिंग (Advance Booking) सुरु असल्याची माहिती दिली आहे.

अक्षय कुमार ने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, "बेल बॉटम आता जवळच्या सिनेमागृहात रिलीज होणार आहे. 19 सप्टेंबर रोजी हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असून याची बुकिंग सुरु झाली आहे. पेटीएम आणि बुक माय शो वरुन तुम्ही सिनेमाचे तिकीट बुक करु शकता किंवा या दोन अॅपद्वारेही तुम्ही तिकीट बुक करु शकाल." (अक्षय कुमार याच्या ‘पृथ्वीराज’ सिनेमाचे नाव बदलण्याची करणी सेनेची मागणी)

पहा पोस्ट:

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

बेल बॉटम सिनेमा हायजॅकिंगवर आधारित आहे. यात अक्षय अंडरकवर एजेंटच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय सिनेमात वाणी कपूर, हुमा कुरैशी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. दरम्यान, सध्या अक्षय कुमार सिनेमाचे प्रोमोशन करताना दिसत आहे.

दरम्यान, कोविड-19 मुळे सिनेमागृह मागील दीड वर्षांपासून बंद आहेत. त्यामुळे थिएटरमध्ये जावून सिनेमाचा आनंदाला प्रेक्षक मुकत आहेत. अनलॉक प्रक्रियेला सुरुवात झाली असून टप्पाटप्प्याने शिथिलता देण्यात येत आहे. त्यामुळे लवकरच सिनेमागृह प्रेक्षकांसाठी खुली होतील, अशी आशा आहे.