![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2021/04/filmfare-2021-babil-khan-380x214.jpg)
बॉलिवूड अभिनेता इरफान खान (Irrfan Khan) सारखा प्रतिभावंत कलाकार आपण मागील वर्षी गमावला. मात्र अजूनही त्याच्या अनेक चाहत्यांना या गोष्टीवर विश्वास बसत नाही. आपल्या कलाकृतींमधून पुन्हा पुन्हा रसिकांसमोर येणारा इरफान अनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या करत आहे. नुकत्याच पार पडलेल्या फिल्मफेअर अवॉर्ड्स (Filmfare Awards )मध्ये त्याला श्रद्धांजली अर्पण करतानाही अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. इमोशनल ट्रिब्युट पाहून इरफानचा लेक बाबिल खान (Babil Khan) देखील भावनाविवश झाल्याचं पहायला मिळालं आहे.
यंदाच्या फिल्मफेयर अवॉर्ड्स दरम्यान अभिनेता आयुषमान खुराना याने एका कवितेच्या माध्यमातून इरफानला श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्याचवेळी त्याच्यावरील चित्रफित दाखवण्यात आली. यावेळी बाबिलला त्याचे अश्रू रोखणं कठीण झाले होते. यावेळी स्टेजवर असलेल्या राजकुमार राव याचे देखील डोळे पाणावले. (वाचा - Filmfare Awards 2021: दिवंगत अभिनेता इरफान खान ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता, तर तापसी पन्नूच्या 'थप्पड' ने जिंकला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार; पहा फिल्मफेअर अवॉर्ड्सची संपूर्ण यादी).
फिल्मफेअर पोस्ट
View this post on Instagram
View this post on Instagram
इरफान खानच्या पश्चात त्याचा लेक बाबिल इरफानचेच कपडे घालून आला होता. या सोहळ्यात विशेष पुरस्काराने इरफानचा गौरव करण्यात आला. तो पुरस्कार बाबिलने स्वीकारला. तेव्हादेखील मनोगत व्यक्त करताना तो अश्रू आवरू शकला नाही. हा पुरस्कार सोहळा 11 एप्रिल दिवशी दुपारी 12 वाजता टीव्हीवर पाहता येणार आहे.