Baahubali to Re-release in Theaters: प्रभास च्या चाहत्यांसाठी खुशखबर! सिनेमागृहात पुन्हा प्रदर्शित होणार 'बाहुबली' सिरीज
Bahubali Series (Photo Credits: Instagram)

Baahubali to Re-release in Theaters: कोरोना व्हायरस (Coronavirus) लॉकडाऊनमुळे (Lockdown) बंद असलेली देशभरातील सिनेमागृह 15 ऑक्टोबर पासून पुन्हा सुरु करण्यात आली. सध्या 50% क्षमतांवर थिएटर्स सुरु आहेत. राज्यातही उद्यापासून सिनेमागृह 50% क्षमतेवर सुरु करण्यास मुभा देण्यात आली आहे. अशातच काही जुने सिनेमे सिनेमागृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, प्रभासच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. एसएस राजामौली (S. S. Rajamouli) यांचा सुपरहिट सिनेमा 'बाहुबली' (Baahubali) आणि 'बाहुबली 2' (Baahubali 2) आता पुन्हा एकदा सिनेमागृहात रिलीज करण्यात येणार आहे. त्यामुळे चाहत्यांना बाहुबली सिनेमा सिरीजमधील भव्यदिव्यता पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे.

करण जोहर याने आज ट्विटरवरुन याची माहिती दिली. या ट्विटमध्ये करणने लिहिले की, "जादू पुन्हा उलघडण्यासाठी सज्ज झाली आहे. प्रभास स्टारर बाहुबली या सीरीजचे दोन्ही सिनेमे लवकरच पुन्हा प्रदर्शित करण्यात येतील." या ट्विटमध्ये करणने राणा दग्गुबाती ला ही टॅग केले आहे. (Prabhas Birthday Special: अबब! 60 कोटींचे घर, 5 लक्जरी कार्स; जाणून घ्या 'बाहुबली' फेम प्रभासची एकूण संपत्ती)

Karan Johar Tweet:

पोस्टरमध्ये दाखवल्याप्रमाणे बाहुबली सिनेमाचा पहिला भाग या शुक्रवारी प्रदर्शित करण्यात येईल. तर दुसरा भाग पुढील शुक्रवारी प्रदर्शित होईल. दरम्यान, सिनेमाच्या दोन्हीही भागांना प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. 'बाहुबली' सिनेमा 2015 मध्ये रिलीज झाला होता. त्यानंतर दुसरा भाग 'बाहुबली 2' 2017 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला. या दोन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत विक्रम रचला होता. इतर सिनेमांनी या सिनेमाचा विक्रम मोडले असले तरी या सिनेमांची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही.