Dilip Kumar With Brother Ahsan and Aslam (Photo Credits: Twitter)

ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar ) यांचे धाकटे बंधू अस्लम खान(Aslam Khan)यांचे निधन झाले आहे. अस्लम यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याने मुंबई मध्ये वांद्रे परिसरातील लीलावती रूग्णालयात (Lilavati Hospital) दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्यांना मधुमेह, हायपर टेंशन, Ischaemic Heart Disease याचा त्रास होता अशी माहिती रूग्णालयाकडून देण्यात आली आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर अशा दीर्घकालीन आजार असलेल्यांमध्ये आजाराची गुंतागुंत अधिक वाढते. अस्लम यांना देखील को-मॉर्बिडीटीचा विळखा असल्याने सुरूवातीपासूनच धोका अधिक होता.  मागील काही दिवसांपासून अस्लम खान यांची प्रकृती चिंताजनक होती. उपचारा दरम्यान त्यांचे आज (21 ऑगस्ट) सकाळी निधन झाले आहे.

अस्लम खान यांच्या सोबतच त्यांचे बंधू इशान खान(Eshan Khan)यांनादेखील कोरोनाची लागण झाल्याने रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्यांची देखील प्रकृती चिंताजनक असल्याचं टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्ट्समधून सांगण्यात आले आहे.

ANI Tweet

अस्लम खान हे 88 वर्षीय होते. त्यांचे पॅरामीटर्स सुरूवाती पासून खालावलेले होते. डॉ.जलील पारकर आणि डॉ. निखिल गोखले हे लीलावती मधील डॉक्टर्स त्यांच्यावर उपचार करत होते. मात्र उपचारादरम्यान अस्लम खान यांचे आज निधन झाले आहे. तर 90 वर्षीय इशान खान रूग्णालयात आयसीयू मध्ये आहेत. सायरा बानू आणि दिलीप कुमार घरीच असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.