Sara Ali Khan, Janhvi Kapoor दोन भावंडांसोबत डेटिंग बाबतच्या Karan Johar च्या खुलाशावर नेटीझन्स कडून या प्रेमप्रकरणातील अंदाज वायरल; महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांची आहेत 'ही' नातवंडं!
Sara Ali Khan, Janhvi Kapoor With Pahariya Brothers| PC: Instagram /veerandsara

कॉफी विथ करण सीझन 7 (Koffee With Karan S7)  टेलिव्हिजन ऐवजी ओटीटी वर यंदा प्रसिद्ध करण्यात आला आहे. पण या टॉक शो ची चर्चा ओटीटी वरूनही तितकीच आहे. किंबहुना पहिल्या एपिसोडची चर्चा तर रेकॉर्डब्रेक ठरली आहे. कालच (14 जुलै) या शो मधील दुसरा भाग प्रसिद्ध करण्यात आला आहे. सारा अली खान (Sara Ali Khan) आणि जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) या शो मधील सेलिब्रिटी गेस्ट होत्या. दरम्यान 'कॉफी विथ करण' आणि सेलिब्रिटींच्या आयुष्यातील 'डीप सिक्रेट्स' यांचा खुलासा हे समीकरणचं झालं आहे. सारा आणि जान्हवीच्या कालच्या एपिसोडमध्येही करण समोर अशाच काही गोष्टींचा खुलासा झाला आहे.

सारा आणि जान्हवी या बी टाऊन मधील बीएफएफ मधील समान गोष्टींचा उल्लेख करताना या दोघींनी दोन भावंडांना डेट केल्याचा उल्लेख केला. आणि मग या माहितीवरून अनेकांनी नेमकी ही भावंडांची जोडी कोण? यावरून थोडं डोकं खाजवलं. दरम्यान ही भावंडांची जोडी वीर आणि शिखर पहारिया आहे. वीर आणि शिखर पहारिया हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांची नातवंडं आहेत.

सारा अली खान हीने बॉलिवूड मध्ये पदार्पणापूर्वी वीर पहारिया ला तर जान्हवी कपूरने शिखर पहारिया याला डेट केलं आहे. काही कारणास्तव या दोन्ही जोड्या टिकू शकल्या नाहीत. चौघेही जण आता आपल्या आयुष्यात पुढे निघून गेले आहेत. दरम्यान कार्यक्रमात बोलता-बोलता करणने पहारिया कुटुंब त्याच्याच इमारती मध्ये राहत असल्याचाही खुलासा केला आहे.

सोशल मीडीयात नेटिझन्सची चर्चा

 

View this post on Instagram

 

A post shared by veersara (@veerandsara)

हे देखील नक्की वाचा: Sara And Janvhi Visit Kedarnath: 'सारा खान' आणि 'जान्हवी कपूर'ने घेतले केदारनाथचे दर्शन .

वीर आणि शिखर यांचे सारा आणि जान्हवी सोबतचे काही जुने फोटोज देखील सध्या वायरल होत आहेत. दरम्यान याच शो मध्ये सारा अली खानला कुणाला डेट करायला आवडेल असा प्रश्न विचारला असता विजय देवरगौंडा याच नाव समोर आलं आहे. पण आता प्रेमप्रकरणांपासून लांब राहून कामावर लक्ष द्यायचं आहे असं साराने स्पष्ट केले आहे.