विराट कोहलीच्या 10000 धावांनंतर अनुष्काने असा व्यक्त केला आनंद
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा (Photo Credits: IANS and Facebook)

वेस्टइंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात खेळत असताना विराट कोहलीने 10000 धावांचा टप्पा पार केला. सचिन तेंडूलकरच्या नावे असलेला 10000 धावांचा विक्रम मोडत विराटने हा विक्रम स्वतःच्या नावे केला. सचिनने 259 डावात 10000 धावा केल्या होत्या. विराट कोहलीने मात्र 205 डावांमध्ये 10000 धावांचा टप्पा गाठला आहे. विराटने गाठला 10000 धावांचा टप्पा ; मोडला सचिनचा विक्रम

विराटच्या या विक्रमानंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असताना त्याची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्माने विक्रमाचा आनंद व्यक्त केला आहे. इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत अनुष्काने पती विराटला शुभेच्छा दिल्या. अनुष्काने स्टोरीमध्ये विराटचे काही फोटोज शेअर केले.

अनुष्काने त्यावर लिहिले की, "What a Man." त्याचबरोबर तिने हात जोडलेला, किंग आणि हार्टचे इमोजी देखील वापरले.

(Photo Credit : Instagram)

अनुष्का शर्मा लवकरच शाहरुख खानच्या झीरो सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या सिनेमात कतरिना कैफ देखील प्रमुख भूमिकेत आहे. हा सिनेमा 21 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येईल.