विराटने गाठला 10000 धावांचा टप्पा ; मोडला सचिनचा विक्रम
भारतीय कर्णधार विराट कोहली (Photo: IANS)

विशाखापट्टनमच्या व्हायएस राजशेखर रेड्डी क्रिकेट स्टेडिअमवर वेस्टइंडीज विरुद्ध रंगलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार विराट कोहलीने सचिन तेंडूलकरचा रेकॉर्ड तोडला आहे. कोहलीने या सामन्यात 81 धावा काढून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 10000 धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. कोहलीने हा रेकॉर्ड 205 डावांमध्ये पूर्ण केला. यापूर्वी हा रेकॉर्ड मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने  259 डावात 10000 धावा करत आपल्या नावे केला होता.

आतापर्यंत कोहलीने वनडे सामन्यात 36 शतकं झळकवली आहेत. पण ज्या पद्धतीने विराट खेळत आहे ते पाहता लवकरच विराट 50 शतकं पूर्ण करेल. कसोटी सामन्यातही त्याने 24 शतकं आपल्या नावे केली आहेत.

विराटचा चाहतावर्ग फार मोठा आहे. पण त्यात आता अजून एका चाहत्याची भर पडली आहे. बांग्लादेश सलामीवीर तमाम इकबाल देखील सहभागी झाला आहे. विराटचे कौतुक करताना तो म्हणाला की, "कधी कधी त्याचा खेळ पाहुन मला असे वाटते की, तो माणूसच नाही. जेव्हा कधी तो फलंदाजीसाठी मैदानात उतरतो तेव्हा प्रत्येक सामन्यात तो शतक झळकवेल, असेच वाटते. ज्याप्रकारे तो स्वतःला फिट ठेवतो किंवा स्वतःच्या खेळावर काम करतो, ते अगदी अविश्वसनीय आहे."