Anurag Kashyap #MeToo Case: बॉलिवूड मधील प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप वर तेलगु अभिनेत्रीने लैंंगिक शोषणाचे आरोप लावताच MeToo चा वाद पुन्हा उफाळुन आला आहे. अनेकांंनी अनुरागला समर्थन सुद्धा दर्शवले आहे तर नेटकर्यांंपैकी अनेकांंनी त्याचा विरोध केलाय. अशातच आता सेक्रेड गेम्स (Sacred Games) मधील अभिनेत्री एलनाज नौरोजी (Elnaaz Norouzi) हिने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करुन अनुराग संबंधीचा एक किस्सा सांंगितला आहे. एलनाज ने आपला व अनुरागचा फोटो शेअर करत एक मोठं कॅप्शन लिहिलंय, ज्यात सेक्रेड गेम्स च्या वेळी एक सेक्स सीन (Sex Scene) शुट करताना आपण कसे घाबरुन टाळाटाळ करत होतो आणि त्यावेळी अनुरागने आपल्याला कसं सांंभाळुन घेतलं याविषयी लिहिलेलं आहे. (हेही वाचा -Anurag Kashyap Accused of Sexual Assault: अनुराग कश्यप वर तेलुगु अभिनेत्रीकडून लैंगिक शोषणाचा आरोप; ट्विटरवर ट्रेंड झाला #ArrestAnuragKashyap)
एलनाज म्हणते की, सेक्रेड गेम्स मध्ये एका सेक्स सीन च्या शुटिंग मध्ये मी खुप नर्व्हस झाले होते, इतंंक की त्यावरुन मी हा प्रोजेक्ट सोडायला जात होते.यावेळी अनुराग सरांंनी मला मॅसेज केला होता, त्यांंनी मला चिंंता करु नको मी काहीतरी करतो असे म्हंंटले होते. त्यानंंतर जेव्हा तो सीन खरचं शुट करायची वेळ आली तेव्हा मला कळलं की काहीही झालं तरी मला हा सीन करण्यापासुन थांंबवता येईल असा काहीच मार्ग नव्हता.मी सेट वर पण नर्व्हस होते तेव्हाही अनुराग सर माझ्याकडे आले आणि त्यांंना मला समजवायला सुरुवात केली, त्यांंनी माझा विचार करुन सीन क्राफ्ट केला होता, मी रडायला लागले, त्यांंनी माझं म्हणणंं ऐकलं होतं, सीन ची मुळ गरज असताना सुद्धा मला कपडे घालुन शुट करायची परवानगी मिळाली होती. त्यांंचे हे वागणे मला खुप आधार देऊन गेले."
अनुराग कश्यप #Metoo Case
दरम्यान, एलनाज ने पुढे म्हंंटले की, केवळ बॉलिवूड मध्येच नाही तर जगभरात अनुराग सारख्या पुरुषाची आणि दिग्दर्शकाची गरज आहे. दुसरीकडे अनुराग आणि मीटू प्रकरणात आता तेलगु अभिनेत्रीने वर्सोवा पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.