Anurag Kashyap Accused of Sexual Assault: अनुराग कश्यप वर तेलुगु अभिनेत्रीकडून लैंगिक शोषणाचा आरोप; ट्विटरवर ट्रेंड झाला #ArrestAnuragKashyap
Anurag Kashyap (Photo Credits: Instagram)

फिल्ममेकर अनुराग कश्यप (Anurag Kashyap) वर एका तेलुगु अभिनेत्रीने लैंगिक शोषणाचा (Sexual Assault) आरोप केला आहे. अनुराग कश्यप याने माझ्यासोबत जबरदस्ती करत खूप वाईट वागणूक दिली असल्याचे या अभिनेत्रीने म्हटले आहे. अभिनेत्रीने यासंदर्भात ट्विट केले असून तिने त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना टॅग केले आहे. तसंच मोदींकडे मदतीची याचना करत तिने लिहिले, "कृपया यावर कारवाई करा आणि देशाला या व्यक्तीचा खरा चेहरा दाखवा. मला माहित आहे, यामुळे माझे नुकसान होऊ शकते आणि माझी सुरक्षितता धोक्यात येऊ शकते. कृपया माझी मदत करा."

यासोबत भारतीय सिनेसृष्टीत #MeToo आंदोलन पुन्हा सुरु झाले आहे, असा आरोपही या अभिनेत्रीने केला आहे. अभिनेत्रीच्या या ट्विटनंतर अनुराग कश्यप याला नेटकऱ्यांकडून प्रचंड टीकेला सामोरे जावे लागत आहे. #ArrestAnuragKashyap ट्विटरवर ट्रेंड होत होता. (अनुराग कश्यप ने कंंगनाला दिला चीन शी लढण्याचा सल्ला, कंंगनाने त्याचीच अक्कल काढत दिले 'हे' उत्तर)

तेलुगु अभिनेत्रीचे ट्विट:

Telugu Actress Tweet

दरम्यान, अभिनेत्री कंगना रनौत हिने देखील या वादात उडी घेत पीडित अभिनेत्रीला पाठींबा दर्शवला आहे. यासाठी केलेल्या ट्विटमध्ये कंगनाने लिहिले, प्रत्येक आवाजाचे महत्त्व आहे. तसंच सोबत # #MeToo आणि #ArrestAnuragKashyap देखील जोडला.

कंगना रनौत ट्विट:

Kangana Ranaut Tweet

नेटकऱ्यांचे ट्विट:

अभिनेत्री कंगना रनौतसह अनेक युजर्सने पीडित अभिनेत्रीला पाठींबा दर्शवत अनुराग कश्यप याला अटक करण्याची मागणी केली.

2018 मध्ये #MeToo चळवळ भारतीय सिनेसृष्टीत सुरु झाली. त्यानंतर अनेक अभिनेत्रींनी त्याच्यावर झालेले अत्याचार उघडपणे सांगितले. यावर डिसेंबर 2018 मध्ये अनुराग कश्पय यांनी देखील आपले मत मांडले होते. "भारतात सुरु झालेली #MeToo चळवळ ही खूप प्रबळ होती आणि त्यामुळे बदल दिसून आला. परंतु, आता अशी परिस्थिती आहे की, सर्वजण राखी सावंत बद्दल बोलत आहेत. जी फक्त लक्ष वेधून घेण्याचे काम करत असून बाकी काही खास करत नाही. #MeToo ने सुरु झालेली चळवळ आता नाहीशी होऊन लोकांना त्याचा विसर पडला आहे," असे अनुराग कश्यप म्हणाला होता.