Ankita Lokhande (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडचा हरहुन्नरी कलाकार सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या आत्महत्येनंतर संपूर्ण देशभरात एकच संतापाची लाट उसळली. बॉलिवूडमधील नेपोटिजम, त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीचे कारनामे अशी अनेक प्रकरणे समोर आली. त्यामुळे अनेक दिवस उलटूनही यामागच्या ख-या सूत्रधारांना अजून गजाआड करण्यात आले नसल्याने हे प्रकरण CBI कडे देण्यात यावे अशी मागणी सर्व स्तरांतून होत होती. अखेर या प्रकरणी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीच्या सुनावणीदरम्यान सॉलिसिटर जनरल तुषार मेहता (Solicitor General Tushar Mehta ) यांनी सीबीआय तपासासाठी बिहार सरकारने केलेल्या शिफारशीला केंद्र सरकारने स्वीकारलं असल्याचं म्हटलं आहे. यामुळे सुशांतच्या चाहत्यांसोबतच त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) हिने देखील इन्स्टाग्रामवर पोस्ट करुन आपला आनंद व्यक्त केला आहे.

सुशांतच्या प्रकरणाचा तपास CBI कडे देण्यात आल्यानंतर अंकिता लोखंड हिने 'ज्या क्षणाची आपण सर्व आतुरतेने वाट पाहात होतो तो क्षण अखेर आला' असे म्हणत इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहे.

View this post on Instagram

Gratitude 🙏🏻 #sushantsinghrajput

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita) on

हेदेखील वाचा- मुंबई पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्यामुळे पटना पोलिसांत FIR दाखल केली; सुशांत सिंह राजपूत याच्या वडीलांचे वक्तव्य (Watch Video)

सुशांतसिंह राजपूत या बॉलिवूडच्या उमद्या कलावंताने 14 जून दिवशी मुंबईच्या वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला. मात्र रिया चक्रवर्ती त्याच्या आत्महत्येला कारणीभूत असल्याचा दावा सिंह कुटुंबाने केला असून पाटना मध्ये त्यांनी FIR नोंदावला आहे. त्यानंतर बिहार पोलिस देखील आत्महत्येचं गुढ उकलण्यासाठी सक्रिय झाले आहे.

दरम्यान अभिनेता सुशांत सिह राजपूत (Sushant Singh Rajput Case) आत्महत्या प्रकरणात भाजप ((BJP)) खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी खळबळजनक दावा केला आहे. सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या केली नाही तर, त्याची हत्या करण्यात आल्याचा दावा नारायण राणे यांनी केला आहे.