मुंबई पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्यामुळे पटना पोलिसांत FIR दाखल केली; सुशांत सिंह राजपूत याच्या वडीलांचे वक्तव्य (Watch Video)
Sushant Singh Rajput's father, Sushant Singh Rajput (Photo Credits: ANI/Twitter)

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याचे आत्महत्या प्रकरण दिवसेंदिवस अधिकाधिक गुंतागुतींचे होत चालले आहे. पटना पोलिस स्थानकात अभिनेत्री आणि सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) हिच्या विरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर आता सुशांतच्या वडीलांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात मुंबई पोलिसांनी सहकार्य न केल्यामुळे पटना पोलिसांत FIR दाखल केली असे ते म्हणाले आहेत.

25 फेब्रुवारीला मी वांद्रे पोलिसांना सुशांत धोक्यात असल्याचे सांगितले होते. 14 जून रोजी सुशांतचे निधन झाले. त्यानंतर पुन्हा 25 फेब्रुवारीला दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत ज्यांची नावे आहेत त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचे मी पोलिसांना सांगितले. पण सुशांतच्या मृत्यूनंतर 40 दिवसांपर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही. म्हणून मी पटना येथे एफआयआर दाखल केली. असे सुशांतच्या वडीलांनी व्हिडिओद्वारे सांगितले आहे. तसंच सुशांत सिंह राजपूत याच्या वडिलांनी या प्रकरणात सत्याची बाजू घेतल्याबद्दल बिहाराचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि त्यांचे सहयोगी मंत्री यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

ANI Tweet:

दरम्यान गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने आणि व्यावसायिक दृष्टीने होत असल्याचे स्पष्ट केले आहे. तर सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी मुंबई पोलिस कार्यक्षम असल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर मुंबई पोलिसांवरील विश्वास व्यक्त करत सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाचा वापर 'बिहार आणि महाराष्ट्रामध्ये वाद निर्माण करण्यासाठी करु नका' असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.