Maharashtra Home Minister Anil Deshmukh (Photo Credits: ANI)

सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आत्महत्ये प्रकरणी दररोज नवनवी माहिती समोर येत आहे. पटना पोलिस स्थानकात सुशांतच्या वडीलांनी गुन्हा दाखल केल्यानंतर या प्रकरणात बिहार पोलिसही सहभागी झाले आहेत. दरम्यान या प्रकरणाची सीबीआय (CBI) चौकशी करण्याची मागणीही जोर धरु लागली आहे. तसंच मुंबई पोलिस (Mumbai Police) सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीची बाजू सांभाळून घेत असल्याचा आरोप देखील केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणातील गुंता दिवसेंदिवस अधिकाधिक वाढत आहे. दरम्यान मुंबई पोलिस सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने आणि व्यावसायिक दृष्टीने करत असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांनी दिली आहे.

14 जून रोजी सुशांत सिंह राजपूत याने मुंबईतील वांद्रे येथील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतच्या अचानक झालेल्या एक्सिटमुळे चाहते, बॉलिवूडकर आणि कुटुंबियांना हादारा बसला. त्यानंतर सुशांतने आत्महत्या का केली याचा तपास सुरु झाला. मुंबई पोलिसांनी सुरु केलेल्या तपासात सुशांतचे मित्र, गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती यांच्यासह बॉलिवूड सेलिब्रेटींची देखील चौकशी करण्यात आली. यात बॉलिवूडमधील नेपोटिज्मचा मुद्दा पुन्हा वर आला. (Sushant Singh Rajput Suicide प्रकरण CBI कडे सोपवा; मुंंबई पोलिसांंनी फक्त Publicity म्हणुन लोकांची चौकशी केली- केंद्रीय मंंत्री आर.के.सिंंह)

ANI Tweet:

दरम्यान काही दिवसांपूर्वी पटना पोलिस स्थानकात सुशांतच्या वडीलांनी गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती विरोधात तक्रार दाखल केल्याने प्रकरणाला वेगळे वळण लागले. मुंबई पोलिस रिया चक्रव्रर्तीला मदत करत असल्याचे आरोप होऊ लागले. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी होऊ लागली. तसंच या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी चाहत्यांसह अनेक राजकर्त्यांनी केली आहे. तर सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणार बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, "मुंबई पोलिस असमर्थ नाहीत. कोणाकडे या प्रकरणाचे पुरावे असतील तर आम्हाला आणून द्या. आम्ही चौकशी करू आणि गुन्हेगाराला शिक्षाही करु. पण प्रकरणाचा वापर बिहार आणि महाराष्ट्रामध्ये वाद निर्माण करण्यासाठी करु नका."