Sushant Singh Rajput Suicide प्रकरण CBI कडे सोपवा; मुंंबई पोलिसांंनी फक्त Publicity म्हणुन लोकांची चौकशी केली- केंद्रीय मंंत्री आर.के.सिंंह
Sushant Singh Rajput (Photo Credits: Instagram)

सुशांंत सिंंह राजपुत (Sushant Singh Rajput) याच्या आत्महत्या प्रकरणात मुंंबई पोलिस केवळ मोठमोठी नावे घेउन वेळ काढत आहेत असा आरोप सुशांंतच्या वडिलांच्या वकिलांंनी लावला होता आता याच पार्श्वभुमीवर केंद्रीय मंंत्री आर. के. सिंह ( Union Minister R. K. Singh) यांंनी सुद्धा मुंंबई पोलिसांवर (Mumbai Police) तोंडसुख घेतले आहे. मुंंबईत सुशांतच्या आत्महत्येनंतर साधी FIR सुद्धा नोंंदवुन घेण्यात आली नाही, चौकशी सुद्धा केवळ बड्या नावांंची जाहिरात करण्यासाठी केली जातेय, कोण चौकशी करतंंय याबाबत माहिती दिली जात नाहीये, अशा वेळी जर का न्याय मिळवायचा असेल सीबीआय चौकशी आवश्यक आहे असेच मत सुशांतच्या कुटुंंबाने सुद्धा व्यक्त केलं आहे, मात्र यासंंदर्भात सुद्धा आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांंच्याशी संपर्क केला असता त्यांनी याला पाठींबा दर्शवला नाही असे आर.के.सिंह यांंनी ANI शी बोलताना म्हंटल आहे.

दुसरीकडे, सुशांतच्या मॅनेजर दिशा सालियन च्या आत्महत्येचा सुद्धा बिहार पोलिसांकडुन तपास केला जाणार आहे. सध्या त्याचे कॉल रेकोर्डस तपासण्याचे काम सुरु आहे. या प्रकरणाचा तपास करण्यात बिहार पोलिस सक्षम आहेत मात्र सुशांंतच्या कुटुंंबाची इच्छा असल्यास ते सीबीआय चौकशी ची मागणी करु शकतात असे काल बिहार पोलिस डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी म्हटले आहे..(Sushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कडक भूमिका; म्हणाले या प्रकरणात बिहार आणि महाराष्ट्रामध्ये भांडणं लावू नका पुरावे असतील तर आम्हाला आणून द्या)

ANI ट्विट

दरम्यान, सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिचा व्हिडिओ हा तिची सच्चाई दाखवत आहे तिने स्वतःला साळसुद दाखवण्यासाठी हे प्रयत्न केले आहेत, सध्या तरी तिच्या चौकशीची गरज वाटत नाही पण लवकरच हे प्रकरण सोडवले जाईल असंही बिहार पोलिसांकडुन सांगण्यात आले आहे. रिया चक्रवती हिने सुद्धा सुप्रीम कोर्टात सीबीआय चौकशीसाठी याचिका दाखल केली आहे.