Sushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कडक भूमिका; म्हणाले या प्रकरणात बिहार आणि महाराष्ट्रामध्ये भांडणं लावू नका पुरावे असतील तर आम्हाला आणून द्या
CM Uddhav Thackeray and Sushant Singh Rajput (Photo Credits: Twitter)

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आत्महत्या प्रकरण दिवसेंदिवस चिघळत चालले आहे. यामध्ये नवनवीन प्रकरणे समोर येत आहेत. यात सामान्य लोकांपासून बॉलिवूड, राजकीय मंडळीचे वेगवेगळे विधान समोर येत आहेत. त्यामुळे या सर्वांवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी भाष्य करत या प्रकरणात राजकारण आणू नका असे कडक शब्दांत सांगितले आहे. त्याचबरोबर बिहार आणि महाराष्ट्रामध्ये भांडणं लावू नका असेही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा मुंबई पोलिस कसून तपास करत आहेत. या तपासासाठी ते सक्षम असून यासाठी CBI चौकशीची गरज नाही असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याआधी स्पष्ट केले होते. या सर्ववर भाष्य करत जर कोणाकडे या संदर्भात काही पुरावे असतील तर आमच्याकडे घेऊन या. आम्ही त्याची चौकशी करुन गुन्हेगाराला शिक्षा करु असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

हेदेखील वाचा- सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर रिया चक्रवर्ती हिने सोडले मौन, व्हिडिओ शेअर करत दिले 'हे' स्पष्टीकरण (Video)

या संपूर्ण प्रकरणाच्या मुळापर्यंत पोहोचावे यासाठी सुशांतची बहिण श्वेता सिंह कीर्ति ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत मागितली आहे. श्वेताने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करुन सांगितले की, "पुराव्यांशी छेडछाड केली जाऊ नये, यासाठी आपण या प्रकरणात लक्ष घालावे." असे तिने सांगितले आहे.