बॉयफ्रेंडने रोमॅन्टिक स्टाईलमध्ये प्रपोज केल्यानंतर 'अशी' होती अंकिता लोखंडे ची प्रतिक्रीया (Photos)
Ankita Lokhande with boyfriend Vicky Jain (Photo Credits: Twitter)

अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) सध्या प्रचंड खूश आहे. याचे कारणही तसे विशेष आहे. बॉयफ्रेंड विक्की जैन (Vicky Jain) ने तिला लग्नासाठी प्रपोज केले आहे. आयुष्यातील ही खास गोष्ट अंकिताने सोशल मीडियावर शेअर केली आहे. या फोटोत विक्की अंकिताला रोमॅन्टिक स्टाईलमध्ये प्रपोज करताना दिसत आहे.

हे खास फोटोज शेअर करत अंकिताने लिहिले की, "मी याबद्दल विचार करेन."

पहा फोटोज:

अंकिताने शेअर केलेले हे फोटोज सध्या सोशल मीडियात चांगलेच व्हायरल होत आहेत. विक्की जैन हा बिजनेसमॅन असून गेल्या काही काळापासून दोघे एकमेकांना डेट करत आहेत. काही दिवसांपूर्वी या दोघांचा किस करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

या वर्षी अंकिता आणि विक्की विवाहबद्ध होतील, अशी चर्चा आहे. मात्र याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या कंगना रानौतच्या 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी' सिनेमात अंकिताचा शाही थाट पाहायला मिळाला होता.