अंकिता लोखंडे हिने सर्वांसमोर प्रियकर विकी जैन ह्याला Kiss केले, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Video)
अंकिता लोखंडे (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम)

'मणिकर्णिका' (Manikarnika) चित्रपटातून डेब्यु करणारी टेलिव्हिजन अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) सध्या आपल्या आयुष्याबद्दल काही गोष्टींबद्दल गुप्तता राखण्याचा प्रयत्न करते. तर अंकिताचा नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून ती तिच्या प्रियकराला किस करताना दिसली आहे.

व्हिडिओमध्ये झळकलेली अंकिता ट्रे़डिशनल लूक मध्ये दिसून येत आहे. त्यावेळी तेथे तिचा प्रियकर विकी जैनसुद्धा उपस्थित असून अंकिता त्याच्यासोबत खुप खुश दिसते आहे. त्यावेळी अचानक डान्स करताना अंकिता विकी ह्याला ओळांवर किस करताना दिसून आल्याने चाहत्यांनी हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात पाहिला. तसेच व्हिडिओवर विविध प्रकाराने आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.(जान्हवी कपूर हिला कार्तिक आर्यन नाही तर 'या' अभिनेत्याला Kiss करण्याची इच्छा)

तर विकी हा मुंबईतील एक उद्योगपती असून अंकिता त्याच्यासोबत बऱ्याच वेळा दिसून आली आहे. तर काही दिवसांपूर्वी अंकिता हिने विकी सोबत असलेल्या प्रेमसंबंधाचा खुलासा केला आहे. यापूर्वी अंकिता ही सुशांत सिंह राजपूत ह्याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये होती.