Alia Bhatt Introduces Raha To Anant Ambani: आलिया भट्टची मुलगी राहासोबत मस्ती करताना दिसले अनंत अंबानी, पहा व्हिडिओ
Alia Bhatt Introduces Raha To Anant Ambani (PC - Instagram)

Alia Bhatt Introduces Raha To Anant Ambani: रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) आणि उद्योगपती वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट गुजरातमधील जामनगरमध्ये लग्नाआधीचा आनंदोत्सव साजरा करत आहेत. अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमध्येही अनेक स्टार्संनी हजेरी लावली आहे. शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान, अर्जुन कपूर, अनिल कपूर, टायगर श्रॉफ आणि आदित्य रॉय कपूर यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी या खास सोहळ्याला हजेरी आहेत. अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) देखील त्यांची मुलगी राहासोबत (Raha Kapoor) उपस्थित राहिले. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये आलिया भट्टची मुलगी राहा कपूर अनंत अंबानीसोबत मस्ती करताना दिसत आहे. (हेही वाचा - Anant-Radhika Pre-Wedding: भाऊ अनंत अंबानीच्या प्री-वेडिंग इव्हेंटमध्ये फ्लोरल गाऊनमध्ये दिसली ईशा अंबानी; See Photos)

अनंत-राधिका मर्चंटचा प्री-वेडिंग ड्रेस कोड 'जंगल फीवर' असा होता. त्यामुळे सर्वच स्टार्स आणि अंबानी फॅमिली या ड्रेस कोडमध्ये दिसली. या खास प्रसंगी आलिया भट्ट मुलगी राहा आणि आलिया जंगल फीवर ड्रेसकोडमध्ये दिसल्या. राहा आणि आलिया या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होत्या. व्हायरल होत असलेल्या या क्लिपमध्ये आलिया राहासोबत अनंत अंबानी यांच्याकडे जाताना दिसत आहे. या व्हिडिओला सोशल मीडियावर खूप पसंती दिली जात आहे. (हेही वाचा -Mukesh Ambani Emotional Moment: मुलाचे भाषण ऐकून मुकेश अंबानींचे डोळे आले भरून; अनंत अंबानीने प्री-वेडिंग प्रोग्राममध्ये सांगितली तब्येतीची समस्या (Watch Video))

राहा कपूर-अनंत अंबानीचा व्हिडिओ पाहा-

 

View this post on Instagram

 

A post shared by F I L M Y G Y A N (@filmygyan)

सध्या आलिया भट्टच्या मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये, अनंतने राहाचा हात हळूवारपणे धरला आहे आणि तो तिच्याशी मस्ती करताना दिसत आहे. आलिया अनंतसोबत गप्पा मारतानाही दिसत आहे. विशेष म्हणजे, रणबीर कपूर आणि आकाश अंबानी खूप चांगले मित्र आहेत. अंबानी कुटुंबातील मुले अनेकदा रणबीर आणि आलियाच्या घरी जाताना दिसतात.