Anant-Radhika Pre-Wedding: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग (Anant-Radhika Pre-Wedding) सेलिब्रेशन आज गुजरातच्या जामनगरमध्ये सुरू झाले आहे. हा कार्यक्रम 3 मार्चपर्यंत चालणार आहे. भाऊ अनंत अंबानीच्या प्री-वेडिंग इव्हेंटमध्ये ईशा अंबानी (Isha Ambani) चा लूक सर्वांनाच प्रभावित करणारा ठरला. नेहमी गोड स्माईल देणाऱ्या ईशाने अनंत अंबानी यांच्या प्री-वेडिंग फंक्शन डे-1 साठी असा लुक निवडला, जो पाहिल्यानंतर सर्वांच्याच नजरा तिच्यावर खिळल्या. ईशा अंबानीसाठी निवडलेला पोशाख पहिल्या दिवसाच्या पार्टी थीम, एन इव्हनिंग इन एव्हरलँडसाठी योग्य होता. ईशाने प्रसिद्ध सेलिब्रिटी स्टायलिस्ट अनिता श्रॉफ अदजानियाने केलेला हा सुंदर कॉकटेल लुक अत्यंत सुरेखतेने कॅरी केला होता.
फ्लोअर लेन्थ न्यूड कॉर्सेट गाउनला 3D चेरी ब्लॉसम्स आणि मॅग्नोलिया फ्लॉवर्स ब्रँच डिझाइनसह एक जबरदस्त लुक देण्यात आला होता. लाँग टेल फ्लॉवर डिझाइन असलेल्या या गुलाबी रंगाच्या गाऊनमध्ये ईशा अंबानी खूपच सुंदर दिसत होती. ईशा अंबानीच्या डिझायनर गाऊनचे स्लीव्हजही खास स्टाइलचे आहेत. फॅशन स्टायलिस्ट अनिता श्रॉफने सोशल मीडियावर ईशाच्या लूकचे फोटो शेअर केले आहेत. (हेही वाचा - Anant-Radhika Pre Wedding: अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये लाइव्ह परफॉर्मन्ससाठी पॉप सिंगर Rihanna ने घेतले 75 कोटी रुपये)
View this post on Instagram
ईशा अंबानीने या सुंदर गाऊनसोबत मोती आणि स्टोनचा चोकर नेकलेस घातला होता. तसेच, ईशाने नेकलेसशी जुळणारे झुमके कॅरी केले आहेत. ईशाने तिच्या भावाच्या प्री-वेडिंग बॅशसाठी मेकअप आणि लाइट शेड लिपस्टिकसह तिचा लूक पूर्ण केला.