Anant-Radhika Pre Wedding: अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये लाइव्ह परफॉर्मन्ससाठी पॉप सिंगर Rihanna ने घेतले 75 कोटी रुपये
Anant Ambani-Radhika Merchant, Rihanna (PC -X, Instagram)

Anant-Radhika Pre Wedding: भारतातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. सध्या अंबानी कुटुंब लग्नाच्या तयारीत व्यस्त आहे. हे लग्न इतके भव्यदिव्य होणार आहे की, शतकानुशतके ते जगभर स्मरणात राहील. रिपोर्ट्सनुसार, या लग्नाला फिल्म स्टार्ससह जगभरातील प्रसिद्ध उद्योगपती आणि कलाकार उपस्थित राहणार आहेत. जामनगरमध्ये 1 ते 3 मार्च दरम्यान अनंत राधिकाचा प्री-वेडिंग सोहळा आयोजित केला जाणार आहे. ज्यामध्ये प्रसिद्ध पॉप गायिका रिहाना (Pop Sensation Rihanna) आणि अरिजित सिंग परफॉर्म करणार आहेत. याआधीही अंबानी कुटुंबाच्या लग्नात परदेशी कलाकारांनी परफॉर्म केले आहे.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनमध्ये परफॉर्म करण्यासाठी सज्ज असलेली पॉप सेन्सेशन रिहाना गुरुवारी जामनगरला पोहोचली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर गायिकेचे अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. रिपोर्ट्सनुसार, रिहाना 1 मार्चला लग्नाआधीच्या एका कार्यक्रमात परफॉर्म करणार आहे. इंडिया टुडे मधील एका अहवालात म्हटले आहे की, रिहानाने तिच्या लाईव्ह परफॉर्मन्ससाठी $8-$9 दशलक्ष (रु. 66 ते 74 कोटी) शुल्क आकारले आहे. अहवालात असेही नमूद केले आहे की, पॉप गायिका तिच्या गाण्यांचा मेडली तसेच डायमंड्स सारख्या सोलो हिट्स सादर करेल. (हेही वाचा - Rihanna Arrives In Jamnagar: अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग सोहळ्यासाठी आंतरराष्ट्रीय स्टार 'रिहाना'चे जामनगर येथे आगमन; सोबत आणलेले सामान पाहून बसेल धक्का (Watch Video))

रिहानासह, अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमधील सेलिब्रिटी पाहुण्यांना अरिजित सिंग, दिलजीत दोसांझ, प्रीतम, अजय-अतुल यांसारख्या दिग्गज कलाकारांचा परफॉर्मन्सही पाहायला मिळणार आहे. त्यांच्यासोबतच या 3 दिवसीय कार्यक्रमासाठी देश-विदेशातील अनेक नामवंत सेलिब्रिटींना आमंत्रित करण्यात आले असून त्यात अमिताभ बच्चन, सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, विकी कौशल, कतरिना कैफ, आलिया भट्ट, रणबीर कपूर, करण जोहर, वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा, श्रद्धा कपूर यांसारख्या नावांचा समावेश आहे. (हेही वाचा: Disney and Reliance to Merge Media Businesses: देशात मनोरंजन ब्रँड तयार करण्यासाठी रिलायन्स मीडिया आणि वॉल्ट डिस्ने यांच्यात मोठा करार; Nita Ambani असतील अध्यक्ष)

व्हीआयपी पाहुण्यांच्या यादीत मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग, मॉर्गन स्टॅनलेचे सीईओ टेड पिक, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स, डिस्नेचे सीईओ बॉब इगर, ब्लॅकरॉकचे सीईओ लॅरी फिंक, ॲडनोकचे सीईओ सुलतान अहमद अल जाबेर आणि ईएल रॉथस्चाइल्ड चेअरमन लिन यांचाही समावेश आहे. अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग सेरेमनीमध्ये प्रत्येक दिवसासाठी खास थीम ठेवण्यात आली आहे.

पाहुण्यांसाठी 2,500 पदार्थ -

अहवालानुसार, त्यांच्या लग्नात पाहुण्यांसाठी सुमारे 2,500 डिश तयार केल्या जातील ज्यात थाई, जपानी, मेक्सिकन, पारशी आणि पॅन आशियाई यासह जागतिक खाद्यपदार्थांचा समावेश असेल. यासाठी 20 महिला शेफसह 65 शेफ आणि पदार्थांनी भरलेले चार ट्रक इंदूरहून जामनगरला पोहोचले आहेत. याशिवाय, तेथे एक विशेष इंदूर सराफा फूड काउंटर देखील स्थापित केले जाईल. जे इंदोरी कचोरी, पोहे जलेबी, भुत्ते की कीस, खोपरा पॅटीस, उपमा आणि इतर प्रसिद्ध पदार्थ अस्सल चवीसह सर्व्ह करेल.