Mukesh Ambani Emotional Moment: मुलाचे भाषण ऐकून मुकेश अंबानींचे डोळे आले भरून; अनंत अंबानीने प्री-वेडिंग प्रोग्राममध्ये सांगितली तब्येतीची समस्या (Watch Video)

अनंतचे भाषण ऐकून मुकेश अंबानी भावूक झाले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हा प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेचा एक ताजा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Mukesh Ambani Emotional Moment: मुलाचे भाषण ऐकून मुकेश अंबानींचे डोळे आले भरून; अनंत अंबानीने प्री-वेडिंग प्रोग्राममध्ये सांगितली तब्येतीची समस्या (Watch Video)
मुलाचे भाषण ऐकून मुकेश अंबानी भावूक (PC - X/@iharsh_18)

Anant Ambani On Mukesh Ambani: गेल्या काही दिवसांपासून अंबानी कुटुंब (Ambani Family) चर्चेत आहे. गुजरातमधील जामनगर (Jamnagar) मध्ये राधिका मर्चेंट (Radhika Merchant) आणि अनंत अंबानी (Anant Ambani) यांचे प्री-वेडिंग फंक्शन (Pre-Wedding Function) सुरू आहे. लग्नापूर्वीच्या या खास सोहळ्याला जगभरातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली आहे. यादरम्यान अनंतने आपल्या आई-वडिलांबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. ज्यामध्ये तो वडील मुकेश अंबानी आणि आई नीता अंबानी (Nita Ambani) यांच्याबद्दल मोकळेपणाने बोलताना दिसत आहे.

अनंतचे भाषण ऐकून मुकेश अंबानी भावूक झाले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हा प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेचा एक ताजा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (हेही वाचा - Anant-Radhika Pre-Wedding: भाऊ अनंत अंबानीच्या प्री-वेडिंग इव्हेंटमध्ये फ्लोरल गाऊनमध्ये दिसली ईशा अंबानी; See Photos)

मुलाचे भाषण ऐकून मुकेश अंबानी झाले भावूक -

प्री-वेडिंग फंक्शनच्या पहिल्या दिवशी, अनंत अंबानी आणि त्यांची भावी पत्नी राधिका मर्चंट यांनी एक खास भाषण दिले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अनंत म्हणत आहेत, 'लहानपणापासून मला आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांचा सामना करावा लागला आहे. पण माझ्या आई-वडिलांनी मला कधीही असं वाटू दिलं नाही की मी कोणत्याही आजाराशी झुंजत आहे. ते नेहमी माझ्या पाठीशी उभे राहिले. मला विश्वास दिला की मी ठीक आहे आणि मी एक दिवस मला पाहिजे ते करेन. यासाठी आई आणि बाबा तुमचे खूप खूप आभार. मुलगा अनंतचे हे शब्द ऐकून मुकेश अंबानी भारावून गेले आणि भावूक झाले. व्हिडिओमध्ये मुकेशच्या डोळ्यात अश्रू दिसत आहेत.  (हेही वाचा - Anant-Radhika Pre Wedding: अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये लाइव्ह परफॉर्मन्ससाठी पॉप सिंगर Rihanna ने घेतले 75 कोटी रुपये)

पहा व्हिडिओ - 

अनंत अंबानी भावी पत्नी राधिकाबद्दल व्यक्त केल्या भावना -

आपल्या भाषणात अनंत अंबानी यांनी राधिका मर्चंटबद्दल आपल्या मनातील भावनाही व्यक्त केल्या. यावेळी अनंत अंबानी म्हणाले, राधिकाला भेटून मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो. ती माझ्या सोबत कशी आहे माहीत नाही, पण जेव्हा मी तिला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा माझ्या आत वादळ उठल्यासारखं वाटलं. राधिका मला पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद.

(The above story first appeared on LatestLY on Mar 02, 2024 07:43 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).