मुस्लिम बांधवांसाठी वर्षातील सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे 'रमजान ईद' (Ramzan Eid). या सणानिमित्त मुस्लिम बांधव एकत्र येऊन नमाज अदा करतात. त्यानंतर आपल्या आप्तलगांना आलिंगन देऊन, भेटवस्तू देऊन ईदी देतात. त्यांच्यासाठी हा सण फार खास असतो. या रमजानच्या रोजाच्या दिवसात या लोकांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळतो. म्हणून बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी देशभरातील तमाम मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करुन त्यांनाी या शुभेच्छा दिल्या आहेत.
बिग बी अमिताभ बच्चन यांनी सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देत मैत्री, प्रेम, बंधुत्व वाढविण्यासाठी सर्वांनी एकत्र राहा, एकमेकांसोबत राहा असे संदेश दिला आहे. आपल्या आप्तलगांसोबत हा सण साजरा करा. सर्वांना उत्तम आरोग्य लाभो अशी प्रार्थनाही बिग बींनी केली आहे. Simple Mehndi Designs For Eid 2020: रमजान ईद च्या निमित्ताने यंदा हाता-पायावर झटपट मेहंदी काढण्यासाठी आयडिया देतील हे लेटेस्ट ट्रेन्डस (Watch Videos)
‘रमजान’चा अर्थात ‘बरकती’चा महिना म्हणतात. मनामनातील दरी कमी करून परस्परांमध्ये स्नेहभाव, सद्भाव वाढविणारा हा महिना. संयम, त्याग, शांती, सहिष्णुता, चांगुलपणा, प्रामाणिकपणा माणसांच्या ठायी रुजविणारा हा महिना असल्यामुळे सर्वांनी शांततेत हा सण साजरा करावा असेही त्यांनी सांगितले.