अमिताभ बच्चन (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना काल (25 सप्टेंबर) दिवशी सिनेजगतातील मानाचा समजला जाणारा दादासाहेब फाळके (Dadasaheb Phalke Award) पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. काल रात्री प्रकाश जावडेकर यांनी या पुरस्काराची घोषणा केल्यानंतर त्यांच्यावर सिनेजगातातील मंडळींसोबतच फॅन्सकडूनही कौतुकाचा वर्षाव सुरू झाला आहे. रात्री उशिरा अमिताभ बच्चन यांनी शुभेच्छांचा स्वीकार करत सार्‍यांचे आभार मानण्यासाठी खस ट्वीट केले आहे. यामध्ये त्यांनी 'मी कृतज्ञ आहे, सार्‍यांचे आभार आणि धन्यवाद... मी केवळ विनम्र अमिताभ बच्चन आहे' अशा आशयाचे ट्वीट त्यांनी शेअर केलं आहे.

अमिताभ बच्चन यांचा यापूर्वी पद्मविभूषण, पद्मभूषण व पद्मश्री पुरस्कारांसोबतच तसेच तीन वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मान झाला आहे. आता त्यांच्या शिरपेचामध्ये 'दादासाहेब फाळके पुरस्कार' हा अजून एक मानाचा पुरस्कार याचादेखील सहभाग झाला आहे. या पुरस्काराचे स्वरूप सुवर्णकमळ, शाल व 10 लाख रुपये रोख असे असते. Dadasaheb Phalke Award 2019: अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर; प्रकाश जावडेकर यांची माहिती.

अमिताभ बच्चन यांचे ट्वीट

अमिताभ बच्चन यांना त्यांच्या परिवाराकडूनदेखील शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. श्वेता नंदा आणि अभिषेक बच्चन यांनी या पुस्काराच्या घोषणेनंतर ट्वीटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.

अमिताभ बच्चन यांनी सात हिंदुस्थानी या सिनेमामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. त्यानंतर अनेक हिंदी सिनेमांमध्ये काम केलेआहे. आता लवकरच ते मराठी सिनेमांमधून रसिकांच्या भेटीला येणार आहेत. विक्रम गोखले यांच्या सोबत 'AB आणि CD'या मराठी सिनेमामध्ये झळकणार आहेत.