अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी पान मसाला कंपनी कमला पसंद (Kamala Pasand) सोबत आपले कॉन्ट्रॅक्ट 11 ऑक्टोंबरला म्हणजेच आपल्या वाढदिवसाच्या दिवशी रद्द केले होते. याच दरम्यान आता असे समोर येत आहे की, अमिताभ बच्चन यांनी पान मसाला कंपनीला एक कायदेशीर नोटीस धाडली आहे. त्याच्या माध्यमातून अशी मागणी करण्यात आली की, ज्या जाहिरातींमध्ये ते आहेत त्या बंद कराव्यात म्हणजेच त्यांचे प्रसारण करणे थांबवावे.(Indian Film Personality of The Year: प्रसिद्ध अभिनेत्री Hema Malini 'इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर' पुरस्काराने सन्मानित)
अमिताभ बच्चन यांनी कमला पसंद यांच्यासोबत आपले कॉन्ट्रॅक्ट संपवत असे म्हटले की, त्यांना ते तंबाखूजन्य जाहिरातीअंतर्गत येत असल्याचे माहिती नव्हते. त्यानंतर आता अमिताभ बच्चन यांनी एक ऐतिहासिक पाऊल उचलत पान मसाला कंपनीला त्यांच्या जाहिराती बंद करण्यासंदर्भात एक लीगल नोटीस पाठवली आहे. नुकत्याच समोर आलेल्या आय ईटाइम्सच्या एका रिपोर्ट्सनुसार, एंडोर्समेंट करार संपल्यानंतर सुद्धा पान मसाला ब्रँन्ड कमला पसंद कडून अमिताभ बच्चन यांची जाहिरात दाखवत आहेत.
सुत्रांच्या हवाल्यानुसार रिपोर्ट्समध्ये असे लिहिले आहे की, अमिताभ बच्चन यांच्या कार्यालयातून कळले कमला पसंदला कायदेशीर नोटीस धाडण्यात आली आहे. ज्यामध्ये अमिताभ बच्चन यांच्या टेलिव्हिजनवरील जाहिरात बंद करण्याचे सांगण्यात आले आहे. कंपनीने म्हटले की, कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर अमिताभ बच्चन यांच्याकडून जाहीर करण्यात आलेल्या एका विधानात असे म्हटले की, कमला पसंद जाहिरात प्रसारित झाल्याच्या काही दिवसानंतर बच्चन यांनी ब्रँन्डला संपर्क केला. तर गेल्या काही आठवड्यापासून स्वत:ला त्यांनी यामधून बाहेर केले आहे.(मामा सलमान खान आणि त्याची भाची आयतचा मंकी टाईम व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल)
दरम्यान, अमिताभ बच्चन यांना त्यांच्या पान मसाला जाहिरातीवरुन ट्रोल केले जात होते. त्यानंतर त्यांनी हे मोठे पाऊल उचलले. त्यांनी पान मसाला कंपनीसोबत आपले कॉन्ट्रॅक रद्द केले. तेव्हा सुद्धा त्यांना ट्रोल केले गेले.