हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांना शनिवार, 20 नोव्हेंबर रोजी इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते हेमा मालिनी यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 52 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) शनिवारपासून म्हणजेच 20 नोव्हेंबरपासून गोव्यात सुरू झाला आहे, जो 28 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. कोरोना महामारीनंतर प्रथमच गोव्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवासाठी 95 देशांतील सुमारे 624 चित्रपट प्रदर्शित करण्यात आले आहेत. हा महोत्सव गोवा सरकार आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या चित्रपट महोत्सव संचालनालयाने संयुक्तपणे आयोजित केला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)