IFFI 2023: केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सोमवारी गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) सांगितले की, सरकार नवीन चित्रपट निर्मिती धोरण जाहीर करणार आहे. परदेशी चित्रपट निर्मात्यांना भारतात चित्रीकरण करण्यासाठी त्यांना 40 टक्के सवलत, चित्रीकरणासाठीची खर्च मर्यादा वाढवून 30 कोटी, तसंच महत्वाच्या भारतीय आशय असलेल्या चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी अतिरिक्त 5 टक्के बोनस दिला जाणार आहे अशी घोषणा अनुराग ठाकुर यांनी केली. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सोमवारी 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन करताना, देशातील परदेशी चित्रपटांच्या निर्मितीसाठी प्रोत्साहन वाढवण्याची आणि देशात होणाऱ्या खर्चाच्या प्रतिपूर्तीची मर्यादा वाढवण्याची घोषणा केली. 2.5 कोटी रुपयांच्या मर्यादेसह देशात झालेल्या खर्चाच्या 30 टक्के पर्यंत परतफेड करण्याची ऑफर दिली आहे.
परदेशी चित्रपट निर्मात्यांना भारतात चित्रीकरण करण्यासाठी त्यांना ४० टक्के सवलत, चित्रीकरणासाठीची खर्च मर्यादा वाढवून ३० कोटी, तसंच महत्वाच्या भारतीय आशय असलेल्या चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी अतिरिक्त ५ टक्के बोनस दिला जाणार - @ianuragthakur @IFFIGoa #IFFI54 #iffigoa #IFFI2023 pic.twitter.com/iqSjKksux9
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) November 20, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)