Amitabh Bachchan & Pulwama Terror Attack (Photo Credits: Twitter)

बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी पुलवामा शहीद 40 जवानांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत केली आहे. फेब्रुवारी महिन्यात पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफ (CRPF) चे 40 जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती. तसंच अनेक दिग्गज खेळाडू, सेलिब्रेटी जवानांच्या मदतीसाठी पुढे सरसावले. महानायक अमिताभ बच्चन यांनी देखील त्यावेळी शहीदांच्या कुटुंबियांना मदत करण्याची इच्छा व्यक्त केली होती. (अमिताभ बच्चन म्हणाले या देशाला करु द्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन, कारण वाचून तुमचं हसू आवरणार नाही)

अलिकडेच बिग बी यांनी बिहारच्या 2100 शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली. त्यानंतर पुलवामा शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदत केल्यानंतर त्यांनी ट्विटरवर खास संदेश लिहिला. त्यांनी लिहिले की, "जो विचार केला होता, जे बोललो होतो, ते आज पूर्ण झाले. देशाच्या रक्षकांना जे काही द्यायचे होते ते दिले. याला समाधान नाही म्हणायचे तर कोणासाठी उदारहण बनलो तर आनंदच होईल."

अमिताभ बच्चन यांचे ट्विट:

आपल्या मनातली इच्छा पूर्ण केल्याबद्दल बीग बी यांनी हे ट्विट केले आहे. समाजातील गरजवंतांना मदत करण्याची अमिताभ बच्चन यांची ही पहिलीच वेळ नसून यापूर्वीही त्यांनी अनेकदा गरजूंना मदत करुन समाजकार्यात हातभार लावला आहे. गेल्या वर्षी त्यांनी उत्तर प्रदेशातील 1000 शेतकऱ्यांना कर्जातून मुक्त होण्यासाठी मदत केली होती.