बॉलिवूड मध्ये बिग बी (Big B) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) यांचे सोमवारी (10 जून) ट्वीटर अकाउंट हॅक करत त्यावर पाकिस्तान (Pakistan) पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांचा फोटो लावण्यात आला होता. या प्रकारामुळे आता पाकिस्तानचा बदला घेतला असून त्यांच्या 5 वेबसाईट हॅक करत भारताचा तिरंगा झळकवण्यात आला आहे.
पाकिस्तानला प्रतिउत्तर देण्यासाठी त्यांच्या वेवसाईटवर अमिताभ बच्चन यांच्यासह भारताच्या तिरंग्याचा फोटो झळकवण्यात आले आहे. तसेच वेबसाईट सुरु केल्यास त्यावर भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम सुरु होते. त्यामुळे पाकिस्तानने केलेल्या त्यांच्या या कृत्याला जश्यास तसे उत्तर देण्यात आले असल्याचे म्हटले जात आहे.
(अमिताभ बच्चन यांचे ट्विटर अकाउंट हॅक, भारताच्या विरोधात ट्विट व्हायरल)
या प्रकरणी 'अय्यिलदीझ तिम' (Ayyıldız Tim Turkish Cyber Armny) तुर्किश संघटनेचा हात असल्याचे समोर आले. तसेच अमिताभ बच्चन यांच्या ट्वीटर अकाउंटचा फोटो बदलत माहितीमध्ये "ऍक्टर.. आतापर्यंत सगळे असं म्हणतायत तरी.. I Love Pakistan" असे लिहून त्यापुढे तुर्कीच्या झेंड्याचा ईमोजी देखील जोडण्यात आला होता.