Birthday Special : ....असे पडले अमिताभ बच्चन हे नाव !
अमिताभ बच्चन (Photo Credits: Instagram)

करोडो चाहत्यांच्या मनावर राज्य करणारे अमिताभ बच्चन यांचा आज 76 वा वाढदिवस आहे. कोणी त्यांना महानायक म्हणतं तर कोणी बिग बी. बॉलिवूडचा असा एक महान कलाकार ज्याने फक्त देशातच नाही तर जगभरात लोकप्रियता मिळवली. बॉलिवूडमध्ये आजही त्यांचे नाव खूप आदराने घेतले जाते. 76 व्या वर्षीही त्यांचा उत्साह आणि जोश तरुणाईला लाजवणार आहे. छोट्या पडद्यापासून ते रुपेरी पडदा गाजवणारे अमिताभ बच्चन यांच्याबद्दल या काही खास गोष्टी खूप कमी लोकांना ठाऊक आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्यांच्याबद्दलच्या काही विशेष गोष्टी...

# बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांनी 1969 पासून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. व्हॉईस नरेटर म्हणून मृणाल सेनचा सिनेमा भुवन शोम मध्ये त्यांनी काम केले. दिग्दर्शक सत्यजित रें ने देखील शतरंज के खिलाडी या सिनेमात अमितजींचा आवाज वापरला.

# सुरुवातीला बिग बींना इंजिनियर व्हायचे होते आणि त्याचबरोबर इंडियन एअर फोर्समध्येही जाण्याचा त्यांची इच्छा होती.

# अमिताभ यांच्या भारदस्त आवाजामुळे त्यांना ऑल इंडिया रेडिओत काम मिळाले नाही.

# अमिताभ यांचा पहिला पगार 300 रुपये होता. 'सात हिंदुस्तानी' या सिनेमातून त्यांनी सिनेसृष्टीत पर्दापण केले.

# अमिताभ यांच्या संघर्षमय दिवसात महमूद यांनी त्यांना आधार दिला आणि त्याचबरोबर त्यांना योग्य मार्गदर्शनही केले.

# सातत्याने 12 सिनेमे फ्लॉप झाल्यानंतर 'जंजीर' सिनेमाला भरगोस यश मिळाले.

 

# अमिताभ यांचे आडनाव श्रीवास्तव होते. त्यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांनी बच्चन आडनावाचा स्वीकार केला आणि त्यांना संपूर्ण कुटुंबाने तेच नाव लावायला सुरुवात केली.

# सुनीत दत्तने अमिताभ बच्चन यांना रेशमा और शेरा मध्ये म्यूट रोलसाठी साईन केले होते. यामागे खास कारण होते. ते असे की, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी नर्गिस दत्त यांना पत्र लिहून अमिताभ यांना कास्ट करण्याची शिफारस केली होती.

# मिस वर्ल्ड ब्यूटी पेजेंट (1995) मध्ये अमिताभ बच्चन जज म्हणून झळकले होते.

 

# इतर अभिनेत्यांच्या तुलनेत अमिताभ यांनी सर्वाधिक डबल रोल्स केले आहेत. महान सिनेमात तर त्यांनी ट्रिपल रोल केला होता.

# अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता नंदा हीने बिजनेसमॅन निखिल नंदासोबत विवाह केला. निखिल नंदा यांची आई ही राज कपूर यांची मुलगी आहे.

 

# अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंशराय बच्चन सुरुवातीला त्यांचे नाव इन्कलाब ठेवणार होते. पण नंतर त्यांनी अमिताभ या नावाला पसंती दिली.