'कलंक' मधून राणीच्या रुपात झळकली आलिया भट्ट, चित्रपटाचे नवीन पोस्टर लॉन्च
'कलंक' मधून राणीच्या रुपात झळकली आलिया भट्ट, चित्रपटाचे नवीन पोस्टर लॉन्च (Photo Credits-Twitter/Instagram)

बॉलिवूडमधील बहुप्रतिक्षित चित्रपट 'कलंक' (Kalank) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर नुकतेच या चित्रपटातील कलाकारांचे फर्स्ट लूक झळकवण्यात आले होते. त्यानंतर आता अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) हिचा राणीच्या रुपातील नवीन लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये आलिया अतिशय अप्रतिम दिसून येत आहे.

करण जोहर दिग्दर्शित कलंक मधील आलिया हिचा नवीन लूक नुकताच झकळवण्यात आला आहे. तर लूकमध्ये आलियाने सफेद रंगाची ओढणी, कानात मोठे झुमके आणि लाल रंगाची बिंदी लावलेले रुप अप्रतिम दिसून येत आहे. त्याचसोबतच आलियाची साजगी आणि सुंदरता राणीच्या रुपात अधिकच खुलुन दिसून येत आहे. या पोस्टमध्ये करण जोहरने ''Courage has never looked this beautiful!'' असे पोस्टच्या खाली लिहिले आहे.(हेही वाचा-Kalank Teaser: आलिया भट्ट, वरुण धवन यांच्या 'कलंक' सिनेमाचा टीझर आऊट; 21 वर्षांनंतर माधुरी दीक्षित-संजय दत्त ही जोडी रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार (Video)

आलिया भट या चित्रपटातून रुप या कलाकाराची भुमिका साकारत आहे. तसेच वरुण धवन, माधुरी दिक्षित, संजय दत्त, आदित्य रॉय कपूर आणि सोनाक्षी सिन्हा हे कलाकारसुद्धा मुख्य भुमिकेतून दिसणार आहे. येत्या 17 एप्रिल रोजी कलंक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.