Alia Bhatt ने बॉयफ्रेंड Ranbir Kapoor सोबत साजरा केला वडील महेश भट्ट यांचा वाढदिवस; पहा Photos
Mahesh Bhatt Birthday Celebration (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक महेश भट्ट (Mahesh Bhatt) यांचा आज 73 वा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर सोशल मीडियाद्वारे चहुबाजूंनी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तर आलिया भट्ट (Alia Bhatt) ने आपल्या वडीलांचा बर्थडे खास अंदाजात सेलिब्रेट केला आहे. या सेलिब्रेशनमध्ये आलियाचा बॉयफ्रेंड आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) देखील सहभागी झाला आहे. यावेळेस आलियाची मोठी बहिण पूजा भट्ट (Pooja Bhatt) देखील उपस्थित होती, या खास बर्थडे सेलिब्रेशनचे (Birthday Celebration) फोटोज (Photos) त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या फोटोज मध्ये सर्वजण ब्लॅक रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहेत. सफेद फुग्यांवर महेश भट्ट यांची स्वभाव वैशिष्टयं लिहिल्याचे पाहायला मिळत आहे. तर व्हिडिओ कॉलद्वारे सोनी राजदान आणि कुटुंबिय सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाल्याचे फोटोजमध्ये दिसत आहे. आलिया हे फोटोज आपल्या इंस्टाग्राम अकाऊंट शेअर केले असून "73 वर्षांचे तरुण!" असे कॅप्शन देत वडीलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (Jee Le Zaraa: पहिल्यांदाच Priyanka Chopra, Alia Bhatt आणि Katrina Kaif दिसणार एकत्र; जाणार रोड ट्रीपवर, Farhan Akhtar घेऊन येत आहे 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' चा सिक्वल)

पहा फोटोज:

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt ☀️ (@aliaabhatt)

दरम्यान, सध्या आलिया भट्ट च्या हातात अनेक सिनेमे आहेत. त्यात गंगुबाई काठियावाडी, आरआरआर आणि ब्रह्मास्त्र हे सर्वांत महत्त्वपूर्ण सिनेमे आहेत. अयान मुखर्जी याच्या ब्रह्मास्त्र सिनेमातून ती पहिल्यांदा रणबीर कपूर सोबत झळकेल.