Priyanka Chopra, Alia Bhatt, Katrina Kaif (Photo Credit : Instagram)

2011 मध्ये हृतिक रोशन, फरहान अख्तर आणि अभय देओल अभिनीत 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. झोया अख्तरने दिग्दर्शित केलेला हा चित्रपट प्रेक्षकांना चांगलाच आवडला होता. आजही हा चित्रपट अनेक तरुणांचा आवडत्या चित्रपटांपैकी एक आहे. आता या चित्रपटाचे एक फिमेल व्हर्जन येऊ घातले आहे, ज्याचे नाव आहे 'जी ले जरा' (Jee Le Zaraa). 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' च्या या सिक्वेलची माहिती आलिया भट्टने (Alia Bhatt) तिच्या सोशल मीडियावर एका छोट्या क्लिपद्वारे तसेच एक फोटोद्वारे दिली आहे.

या चित्रपटामध्ये आलियासोबत प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) आणि कटरीना कैफ (Katrina Kaif) दिसणार आहेत. अशाप्रकारे पहिल्यांदा बॉलिवूडमधील स्टार अभिनेत्री प्रियंका, आलिया आणि कतरिना एकत्र काम करणार आहेत. पोस्टरवरून दिसत आहे की, यावेळी हा चित्रपट झोया अख्तर नाही तर फरहान अख्तर दिग्दर्शित करणार आहे. फरहानने यापूर्वी 'दिल चाहता है' आणि 'लक्ष्य' सारख्या सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

या चित्रपटाच्या घोषणेनंतर आता कतरिना, प्रियंका आणि आलिया या तिघांनीही एकाच फोटोसह वेगवेगळ्या पोस्ट शेअर केल्या आहेत आणि या चित्रपटाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. प्रियंकाने सांगितले आहे की, या चित्रपटाची कल्पना 2019 मध्ये तयार झाली व फेब्रुवारी 2020 मध्ये आम्ही सर्वजण भेटले. मात्र त्यानंतर आता तीन वर्षांनी आमच्या तिघींचेही वेळापत्रक जुळून आले असून या चित्रपटाला सुरुवात होत आहे. (हेही वाचा: Bachpan Ka Pyar: बचपन का प्यार गाण्याचा टीझर झाला प्रदर्शित, सिंगर बादशाहाने सोशल मीडियावर केले पोस्ट)

आलिया भट्टने म्हटले आहे, दोन वर्षांपूर्वी तीन मुली एका स्वप्नासह एकत्र आल्या होत्या व आता ते स्वप्न सत्यात उतरत आहे. या पोस्टला उत्तर देताना फरहान अख्तरने लिहिले की, त्याला उद्यापासूनच शूटिंग सुरू करायचे आहे. दरम्यान, चित्रपटाची कथा झोया अख्तर, फरहान अख्तर आणि रीमा कागती यांनी लिहिली आहे. रीमा, झोया रितेश आणि फरहान हे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे.