आलिया भट्ट (Alia Bhatt) हिचे आजही कमी वयात यशाच्या शिखरावर जाऊन पोहचलेल्या अभिनेत्रीच्या नावात उल्लेख केला जातो. आपली धमाकेदार भुमिका आणि अंजादातून व्यक्त होणारी आलिया 2019 मधील टॉप अभिनेत्रींच्या लिस्टमध्ये दाखल झाली आहे. यामुळे आलिया सध्या खुप खुश दिसून येत आहे. तसेच आगामी चित्रपट 'गली बॉय' (Gully Boy) मधून पुन्हा एकदा धमाकेदार अंदाजातून आलिया प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सध्या आलिया काही वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. आलिया सध्या लक्झरी वस्तू खरेदी करण्यामध्ये वस्त आहे. तर नुकतेच 13 करोड रुपयांचे नवं घर घेतल्याने अजूनच चर्चेत आली आहे. तर आता आलियाने नवीन ब्रँन्ड न्यू व्हॅनिटी खरेदी केली असून त्याचे इंटिरिअर खुद्द गौरी खान (Gauri Khan) हिने केले आहे. (हेही वाचा-Gully Boy Doori song: गरीबीतील हतबलता व्यक्त करणारे रणवीर सिंगच्या आवाजातील 'दूरी' गाणे रसिकांच्या भेटीला!)
View this post on Instagram
When one has to direct ones shot cause one isn't blessed with long legs 🙄📸🎬
आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन आलियाने या लक्झरियस वॅनिटी वॅनचे फोटो पोस्ट केले आहेत. तसेच गौरी खान हिच्या अप्रतिम इंटिरिअर डिझाईनचे भरभरुन कौतुक पोस्टच्या माध्यमातून केले आहे. या वॅनिटीमध्ये लाईटिंग उत्कृष्ट पद्धतीची केली आहे. त्यासोबत भिंतीवर पुस्तके आणि विंटेंज लँपच्या आधारे वॅनिटी वॅन डिझाईन करण्यात आली आहे. तर आलियाने वॅनिटीच्या नव्या रुपाला Moving Home असे नाव दिले आहे.