Gully Boy New Posters : 'गली  बॉय' सिनेमात रणवीर सिंग, आलिया भट्ट दिसणार 'या' अंदाजात
Ranveer Singh and Alia Bhatt for Gully Boy. Picture Courtesy: Twitter

Gully Boy New Posters : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणवीर सिंग (Ranveer Singh)  यांनी झोया अख्तर (Zoya Akhtar) दिग्दर्शित Gully Boy सिनेमाची पहिली चाहत्यांसोबत शेअर केली. आज या सिनेमातील रणवीर सिंग आणि आलिया भट्ट या जोडीचा लूक रसिकांसमोर आला आहे. या सिनेमात रणवीर एका रॅपरची भूमिका साकारणार आहे तर आलिया भट्ट त्याची प्रेमिका आहे.

रणवीर आणि आलिया पहिल्यांदा एकत्र

Gully Boy सिनेमातून आलिया आणि रणवीर ही जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे. मुंबईच्या रस्त्यांवर राहणारा सामान्य रॅपरची कहाणी सिनेमात पाहता येणार आहे. रणवीर सिंगच्या मागील काही सिनेमांमध्ये तुम्ही त्याला राजेशाही अंदाजात अनेकदा पाहिले असेल पण आगामी गली बॉय सिनेमामध्ये रणवीर क्लिन शेव्ह लुकमध्ये, कानात हेडफोन्स घालुन दिसत आहे. रणवीरला सिनेमात साथ देणारी आलिया भट्ट देखील तितक्याच साध्या अंदाजात आहे. (पहा 'गली बॉय' सिनेमाची पहिली झलक) 

गली बॉय हा सिनेमा 14 फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन डे दिवशी रीलिज होणार आहे. पहिल्यांदाच रणवीर आणि आलिया एकत्र रसिकांच्या भेटीला येत असल्याने या सिनेमामध्ये त्यांच्या चाहत्यांमध्ये विशेष उत्सुकता आहे.