Gully Boy Poster: रणवीर सिंग आणि आलिया भट्ट 14 फेब्रुवारी 2019 ला घेऊन येणार 'गली बॉय' सिनेमा
Gully Boy Poster | Photo Credit: Instagram

Gully Boy Poster: झोया अख्तर दिग्दर्शित 'गली  बॉय' (Gully Boy) या सिनेमाचं पाहिलं वाहिलं पोस्टर आज नववर्षाच्या पहिल्याच दिवशी शेअर करण्यात आलं आहे. अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh)  आणि आलिया भट्ट (Alia Bhatt ) ही फ्रेश जोडी पहिल्यांदा रसिकांसमोर येणार आहे. सध्या नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी दोघेही भारताबाहेर आहेत मात्र त्यांनी सोशल  मीडियाच्या माध्यामातून आगामी 'गली  बॉय' सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित केलं आहे. हा सिनेमा 14 फेब्रुवारी 2019 रोजी रसिकांच्या भेटीला येणार आहे.

एका रस्त्यावर राहणाऱ्या रॅपरच्या प्रवासाची ही कहाणी आहे. रणवीर सिंग या सिनेमामध्ये प्रमुख भूमिकेत आहे. पोस्टरमध्ये रणवीर कॅमेऱ्याकडे पाठ करून हुडी घालून आहे. पोस्टरवर ' अपना टाइम आएगा' असं लिहण्यात आलं आहे. या सिनेमात कल्की कोचीन, अली असगर, परमित सेठी आणि पूजा गौर प्रमुख भूमिकेत आहेत.

गली  बॉय पाठोपाठ रणवीर आणि आलिया ही जोडी करण जोहरच्या आगामी तख्त सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात जान्हवी कपूर, करीना कपूर, विक्की कौशल अशी स्टारकास्ट झळकणार आहे.