Akshay Kumar in Laxmmi Bomb (Photo Credits: Instagram)

कोरोना विषाणूमुळे (Coronavirus) सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे (Lockdown) अनेक चित्रपटांचे प्रदर्शन पुढे ढकलले गेले आहे. अलीकडे, अशी बातमी आली होती की सद्य परिस्थिती पाहता काही चित्रपट निर्माते त्यांचे चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करू शकतात. आता अशी बातमी आहे की, अक्षय कुमारचा (Akshay Kumar) बहुचर्चित हॉरर कॉमेडी चित्रपट 'लक्ष्मी बॉम्ब' (Laxmmi Bomb) सिनेमागृहात प्रदर्शित होणार नसून, थेट जूनमध्ये ओटीटीच्या व्यासपीठ हॉटस्टारवर (Hotstar) प्रदर्शित होईल. जवळपास दीड महिन्यांपासून बंद असलेल्या सिनेमागृहांमुळे चित्रपट निर्मात्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. आता लॉक डाऊन संपण्याची जास्त प्रतीक्षा करण्याऐवजी निर्माते चित्रपटांच्या प्रदर्षांसाठी ओटीटी प्लॅटफॉर्मचा एक चांगला पर्याय म्हणून विचार करीत आहेत.

'लक्ष्मी बॉम्ब' बाबत अक्षय कुमार, विजय सिंह (फॉक्स स्टार स्टुडिओ) आणि तुषार कपूर (निर्माते) गेल्या 3 आठवड्यांपासून डिस्ने + हॉटस्टारच्या अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉलिंगवर संभाषणा करत होते. अखेर 4 मे रोजी झालेल्या बैठकीत सर्वांनी या निर्णयावर सहमती दर्शविली, त्यानुसार ते त्यांचा चित्रपट थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करतील. सप्टेंबरपूर्वी चित्रपटगृह सुरू होण्याची अपेक्षा नसल्याने चित्रपटाशी संबंधित सर्व भागधारकांनी आपला चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे.

India Lockdown कर्णबधिर जोडप्यांनी बांधली लग्न गाठ; नियमांच पालन करत पार पडला सोहळा - Watch Video 

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये लक्ष्मी बॉम्बचा मुख्य भाग शूट करण्यात आला होता आणि उर्वरित काम फेब्रुवारीमध्ये पूर्ण झाले होते. चित्रपटाचे दिग्दर्शक राघव लॉरेन्स सध्या हैदराबाद येथे चित्रपटाचे अंतिम संपादन आणि पोस्ट प्रॉडक्शनवर काम करत आहेत. लक्ष्मी बॉम्बमध्ये 'अक्षय कुमार' ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात कियारा अडवाणी अक्षय कुमारच्या विरुद्ध दिसणार आहेत. हा चित्रपट दक्षिण भारतीय हॉरर कॉमेडी चित्रपट ‘कांचना’चा हिंदी रिमेक आहे.