Akshay Kumar Upcoming Films: 2020-21 मध्ये बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचे 'हे' चित्रपट प्रदर्शित होणार
Akshay Kumar Upcoming Films 2020 (PC - Instagram)

Akshay Kumar Upcoming Films: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारवर (Akshay Kumar)  यंदा चित्रपटांचा पाऊस पडला आहे. कारण 2020 मध्ये त्याच्या वाट्याला सर्वाधिक चित्रपट आले आहेत. 2018-19 मध्ये अक्षयने दमदार भूमिका केल्या. यंदाही अक्षय कुमार विविध भूमिका साकारताना दिसणार आहे. आज आपण या लेखातून अक्षय कुमार 2020-21 मध्ये कोण-कोणत्या चित्रपटातून आपल्या प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे ते पाहुयात.

बॉलिवूडचा सर्वात महागड्या कलाकारांच्या यादीत अक्षय कुमारचंही नाव येतं. अक्षय कुमारला बॉलीवुडचा खिलाडी नंबर वन असं म्हटलं जातं. अक्षय कुमारचा अभिनय, कॉमेडीचं टायमिंग, स्टंट्समुळे त्याचे अनेक चाहते आहेत. अक्षय कुमारने नेहमी साधेपणा जपत माणूसकीही जपली आहे. अक्षय कुमारेच्या चाहत्यांसाठी यंदाचे वर्ष एक प्रकारची परवणीच असणार आहे. (हेही वाचा - Man vs Wild: रजनीकांत, अक्षय कुमारनंतर Bear Grylls च्या 'मॅन व्हर्सेस वाइल्ड'मध्ये झळकणार दीपिका पदुकोण आणि विराट कोहली)

सूर्यवंशी -

अक्षयची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टीनं केलं आहे. येत्या 27 मार्च 2020 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत कतरिना कैफही दिसणार आहे.

लक्ष्मी बॉम्ब -

'लक्ष्मी बॉम्ब' या चित्रपटात अक्षय कुमार एका वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात किआरा अडवाणी मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट तामिळ सिनेमाचा रिमेक असणार आहे. ईदच्या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

पृथ्वीराज -

'पृथ्वीराज' या चित्रपटात अक्षय कुमार पहिल्यांदाच ऐतिहासिक भूमिका साकारताना दिसणार आहे. यंदा दिवाळीत हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटामधून मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

बेल बॉटम -

'बेल बॉटम' हा चित्रपट 2 एप्रिल 2021 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट गुप्तचर यंत्रणेवर आधारित असणार आहे.

बच्चन पांडे -

'बच्चन पांडे' या चित्रपटामध्ये अक्षय कुमार मुख्य भूमिका साकारणार आहे. तसेच बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सॅनॉन या चित्रपटात प्रमुख अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. 22 जानेवारी 2021 ला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

अतरंगी रे -

'अतरंगी रे' या चित्रपटात अक्षय कुमार सारा अली खान आणि धनुष्यसोबत दिसणार आहे. सुशांत सिंग राजपूत, रणवीर सिंग, कार्तिक आर्यननंतर सारा अली खान पहिल्यांदाच अक्षय कुमार व धनुष सोबत काम करणार आहे.