Hathras Gangrape: हाथरस सामूहिक बलात्कार घटनेबाबत अभिनेता अक्षय कुमार ने ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केली नाराजी, म्हणाला दोषींना फाशी द्या
Akshay Kumar on Hathras Gangrape (Photo Credits: Instagram)

माणुसकीला काळिमा फासणारी हृद्यद्रावक घटना उत्तर प्रदेशातील हाथरस (Hathras Gangrape) जिल्ह्यामध्ये घडली. जेथे 4 नराधमांनी 19 वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केला. या घटनेने गंभीर जखमी झालेली या अल्पवयीन मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण देश हादरला असून लोकांमधून संतापाची लाट उसळत आहे. सोशल मिडियावरही लोक या घटनेचा निषेध करत आहे. या प्रकरणी 4 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही घटना ऐकून अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याने ट्विटच्या माध्यमातून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दोषींना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी त्यांनी केली आहे.

'मी खूप क्रोधित आणि निराश आहे. हाथरसमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कारासारखी क्रूरता कधी थांबणार? आपला कायदा इतका मजबूत बनवावा लागेल की बलात्काराच्या विचारानेच आरोपी भीतीने थरथर कापतील. या घटनेतील दोषींना फाशी द्या.' अशी मागणी अक्षय कुमारने आपल्या ट्विटमध्ये केली आहे. आपल्या बहिण-लेकींसाठी आवाज उठवा एवढ तर आपण करुच शकतो. असेही तो म्हणाला आहे. Hathras Gangrape: उत्तर प्रदेशात 4 जणांकडून बलात्कार झालेल्या 19 वर्षीय मुलीचा दिल्लीच्या रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू

हाथरसमध्ये झालेल्या या घटनेत सामूहिक बलात्कार झालेल्या तरुणीला दिल्लीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 14 सप्टेंबरला या मुलीवर बलात्कार झाला होता. मात्र तिच्या तब्येतीत सुधारणा न झाल्याने तिला दिल्लीच्या रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान या मुलीचा आज मृत्यू झाला. कोर्टात दिलेल्या जबाबामध्ये पीडित मुलीने तिच्यावर 4 जणांकडून बलात्कार झाल्याची माहिती दिली आहे. जनावरांसाठी चारा आणण्यासाठी जाताना तिच्यावर 4 पुरूषांकडून बलात्कार झाला.

अक्षय कुमार सह बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत आणि स्वरा भास्कर यांनी देखील या घटनेचा निषेध करत दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे.